महिलांनी ‘सायबर सेफ’ राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 06:00 AM2020-12-04T06:00:00+5:302020-12-04T06:00:02+5:30

यावेळी प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, सायबर सेलचे प्रमुख तुषार चव्हाण, सहाय्यक पोलीस अधिकारी आकुरके, मुजावर अली, संगणक विभाग प्रमुख एस. बी. किशोर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके दक्षता समितीच्या सदस्य, एनजीओचे सदस्य उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक खैरे म्हणाले, दररोजच्या आयुष्यात शेकडो कामे आता इंटरनेटशी संबंधित झाली आहे.

Women should be 'cyber-safe' | महिलांनी ‘सायबर सेफ’ राहावे

महिलांनी ‘सायबर सेफ’ राहावे

Next
ठळक मुद्देप्रशांत खैरे : पोलीस विभागातर्फे सेल सायबर सेफ वुमन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : बदलत्या जीवनशैलीमध्ये दररोज आपला संबंध तंत्रज्ञानाशी येतो. खाजगीपणातही तंत्रज्ञानाचा प्रचंड हस्तक्षेप वाढत आहे. तथापि, हे जीवन आम्ही स्वीकारले आहे. त्यामुळे आता दररोजच्या आयुष्यामध्ये सायबर सेफ कसे राहता येईल याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राज्य सायबर सेल पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित 'सायबर सेफ वुमन' कार्यक्रमात ते बोलत होते. मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात मूल व चंद्रपूर येथे तीन कार्यक्रम झाले.
यावेळी प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, सायबर सेलचे प्रमुख तुषार चव्हाण, सहाय्यक पोलीस अधिकारी आकुरके, मुजावर अली, संगणक विभाग प्रमुख एस. बी. किशोर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके दक्षता समितीच्या सदस्य, एनजीओचे सदस्य उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक खैरे म्हणाले, दररोजच्या आयुष्यात शेकडो कामे आता इंटरनेटशी संबंधित झाली आहे. त्यामुळे कशावर निर्बंध आणावे व सावधतेने कामे कशी करावी याबाबतचे कोष्टक तयार करणे केले पाहिजे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एकूरके म्हणाल्या, समाजाच्या सामाजिक मानसिकतेची बदल करणे गरजेचे आहे. स्वत:च्या सुरक्षेसंदर्भात महिलांनी जागरूक राहावे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी सायबर सेफ वुमेन मोहिमेची माहिती दिली. सायबर सेलचे मुजावर अली यांनी पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. संचालन प्रा. प्रवीण ठाकरे यांनी केले. प्रा. रेणुका राऊत यांनी आभार मानले.

गुन्ह्यांचे प्रकार व कायद्यांची माहिती
इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैंगिक शोषण, ज्येष्ठांची फसवणूक, फूस लावण्याचे प्रकार, फेक मेसेज, एटीएम कार्ड फसवणूक कशी होते. बालकांविरूद्ध अन्यायासंदर्भातील गुन्हे, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार, मानसिक त्रास, पोक्सो कायदा, १०० क्रमांकांचा उपयोग, पोलीस सारथी व सायबर सेफ्टी कायद्यांची माहिती यावेळी तज्ज्ञांनी दिली.

Web Title: Women should be 'cyber-safe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस