शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांवर वक्रदृष्टी

By admin | Updated: June 4, 2014 23:39 IST

चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई व उमा या नद्या वाहतात. या नद्यांवर जिल्ह्याची तहान व सिंचन अवलंबून आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे उद्योगांची

आजारात वाढ : उद्योगांतील दूषित पाणी नदीतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई व उमा या नद्या वाहतात. या नद्यांवर जिल्ह्याची तहान व सिंचन अवलंबून आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे उद्योगांची वक्रदृष्टी या नद्यांवर पडली आहे. या नद्यांमध्ये विष ओतण्याचे काम उद्योग सातत्याने करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे मोठे जलस्रोतही प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणारी वर्धा नदी जणू नागरिकांपेक्षा उद्योजकांचेच पोट भरण्यासाठी अस्तित्वात आली असावी, असे एकंदरीत परिस्थिती पाहता दिसून येते. वरोरा, बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील पॉवर कंपन्या, सिमेंट कंपन्या याच नदीवर अवलंबून आहे. या नदीतील मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उपसा या कंपन्या करतात आणि राक्षसी परतफेड करतात. आपल्या कंपनीतील रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात असल्याने वर्धासारखी मोठी नदीही दूषित झाली आहे. वेकोलि प्रशासनानेही या नदीवर वाट्टेल तसा अत्याचार केला आहे. इरई नदीचीही तीच परिस्थिती करून टाकली आहे. या नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी  आंदोलन सुरु केले आहे. मात्र प्रशासनाला कधी जाग आली नाही. बल्लारपूर पेपरमीलमधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे. झरपट नदी तर, पूर्वी चंद्रपूरची जीवनदायिनी होती. मात्र या नदीचा डोळ्यादेखत नाला करून टाकला आहे.  झरपट नदी वाचविण्यासाठी एकाही राजकीय नेत्याने वा प्रशासकीय अधिकार्‍याने धडपड केली नाही. उलट ती प्रदूषित करणार्‍यांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शहरातील ज्या भागात नदीच्या प्रवाहाने स्पर्श करून पवित्र केले, तेथील पावित्र्य कायम न राखता सांडपाणी नदीत सोडण्यात आले. याशिवाय शहरातील सुमारे ६0 टक्के मलवाहिन्या झरपटमध्येच विलीन करून स्थानिक राज्यकर्त्यांनी संपूर्ण नदीचे वाटोळे केले आहे. १५ कि.मी. एवढी कमी लांबी असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. उलट नदीची गटारगंगा कशी करता येईल, याचाच पध्दतशीर प्रयत्न झाला. या नदीतून वाळूचा मोठय़ा प्रमाणात उपसा करण्यात आला. पात्रातील बारीकसारिक खडकंही गायब करण्यात आले. आता तर नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळूच दिसत नाही. वाळूऐवजी चिखल, घराघरातून आणि नालीतून आलेल्या मळाचे साम्राज्य दिसते. शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम, अंचलेश्‍वर गेट, संतोषी माता मंदिर परिसर, ताडबन परिसर, हनुमान खिडकी परिसर, पठाणपुरा वार्ड या भागातील सांडपाणी नदीत सोडले जाते. मच्छीनाल्याचेही काही पाणी रामाळा तलावात जाते आणि बाकी सर्व पाणी झरपट नदीतच मिसळते. याशिवाय शहरातील कचरा, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्याही नदीतच टाकल्या जातात. विशेष म्हणजे, शहरातील सुमारे ६0 टक्के मलवाहिन्या पूर्वीपासून झरपट नदीतच विलीन करण्यात आल्या आहेत.  या नदीत प्राणवायूचे प्रमाण अत्यंत कमी आणि सल्फेट, हेवी मेटल अशा घातक रसायनाचे प्रमाण अधिक आढळून आले होते. अर्थात, कोणत्याही परिस्थितीत झरपट नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही, हे स्पष्टच आहे. असे असताना महाकाली यात्रेसाठी येणार्‍या भाविकांना आंघोळीसाठी याच पाण्याचा आधार घ्यावा लागतो. जिल्ह्यात नानाविध संस्था सामाजिक कार्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रदुषित जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. विविध मुद्यांवर या संस्थांनी आजवर आंदोलने केली आहेत. मात्र जिल्ह्यातून वाहणार्‍या नद्या आणि प्रदूषणामुळे त्यांची होत असलेली वाताहात त्यांना अंतर्बाह्य अस्वस्थ करीत नाही. त्यामुळेच यासाठी एकही संस्था दमदार आंदोलन उभे करू शकली नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडला जातो. मात्र वाहती नदी डोळ्याआड करून तिचे वाटोळे होत असतानाही जीवनदायिनींना वाचविण्यासाठी प्रशासनाला गदगद हालविले जात नाही. बोटावर मोजण्याएवढय़ा एकदोन जणांनी आपआपल्या परीने थोडेफार प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना पुढार्‍यांची आणि प्रशासनाची फारशी साथ मिळाली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाचे कार्यालय आणि त्यातील अधिकारी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत आहेत, मात्र त्यांनी कसलेही प्रयत्न केले नाही.जिल्ह्यातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत पर्यावरण संतुलनाचे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.