शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार लिलाव प्रक्रियेत विधवा महिलेने केली पुरुषांवर मात

By admin | Updated: March 27, 2016 00:40 IST

आठवडी बाजार ठेका लिलाव प्रक्रियेत नेहमी पुरुषांची मक्तेदारी असे. आठवडी बाजारात व्यापारी-शेतकरी, नानाप्रकारचे ग्राहक येतात.

पुरूषांची मक्तेदारी मोडीत : सावलीची महिला ठरली ‘लय भारी’सावली : आठवडी बाजार ठेका लिलाव प्रक्रियेत नेहमी पुरुषांची मक्तेदारी असे. आठवडी बाजारात व्यापारी-शेतकरी, नानाप्रकारचे ग्राहक येतात. बाजारची फी घेण्यावरुन अनेकदा वाद, हाणामारी होत असते. त्यामुळे बाजार ठेकेदारीत महिला रस घेत नाहीत. पण या परंपरेला एका महिलेने छेद दिला आहे. सर्वाधिक बोली लावून आपल्या नावे ठेका घेतला आहे. सावलीची ही महिला लिलाव प्रक्रियेत सरस ठरल्याने पुरुष मंडळींना रित्या हाताने परतावे लागले.१८ मार्चला सावली नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष रजनी भडके, मुख्याधिकारी पेंदोरकार व नगरसेवकांच्या उपस्थितीत आठवडी बाजार व गुजरी ठेका लिलावाची प्रक्रीया प्रार पडली. बोली बोलणारे अनेक कंत्राटदार यावेळी उपस्थित होते. त्यात पुरुषांची संख्या अधिक होती. यासोबतच एक विधवा महिला उपस्थित होती. आठवडी बाजारासाठी बोली सुरू झाली. एकावर एक बोली लावत होते. शेवटी महिलेने सर्वाधिक बोली लावून तीन लाख ६० हजार व गुजरीचा ठेका ८० हजार रुपयांत आपल्या नावे करून घेतला.माधुरी धनवंत संतोषवार असे त्या महिलेचे नाव असून ती सावली येथील रहिवासी आहे. तिला केवळ एका मुलीचा आधार आहे. घरातील कर्ता पुरुष कुणीच नाही. सासू-सासरे-पती यांचे निधन झाल्याने घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर आली. शेती आहे पण कर्ता पुरुष नसल्याने ती ठेक्याने दिली जाते. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कोणतातरी व्यवसाय करावा लागतो. मग व्यवसाय नेमका कोणता करायचा या विचारात असतानाच ज्यांच्या घरी हा व्यवसाय केल्या जात होता, त्यांचे काम करणारे साथीदार सोबत होते. त्यांच्या हिंमतीवर माधुरीने बाजार लिलाव व गुजरी ठेका घेतला. हा व्यवसाय सहज व सोपा नाही. व्यापाऱ्यांचे बोलणे ऐकावे लागतात. तेथील मजुरी काहीही बोलतात. पण मनात निश्चय व काम करण्याची जिद्द असली की कठीण उद्योगसुद्धा सोपा होतो, हे तिने दाखवून दिले. (शहर प्रतिनिधी)