शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकारी शाळेत येताच मद्यपी शिक्षकाने काढला पळ

By admin | Updated: February 10, 2016 00:53 IST

गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक शाळेला भेट दिल्यानंतर नेहमीच शाळेत मद्य प्राशन करून येणाऱ्या एका शिक्षकाची चांगलीच भंबेरी उडाली.

कान्हळगावातील प्रकार : अनागोंदीने गावकरी त्रस्तकोरपना: गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक शाळेला भेट दिल्यानंतर नेहमीच शाळेत मद्य प्राशन करून येणाऱ्या एका शिक्षकाची चांगलीच भंबेरी उडाली. त्याला शाळेतून पळ काढावा लागल्याची घटना मंगळवारी तालुक्यातील कन्हाळगाव येथे घडली.कन्हाळगाव जिल्हा परिषद शाळेतील दिलीप मोंढे हा शिक्षक नेहमीच दारू पिऊन शाळेत येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, गावातील नागरिकांनी शिक्षण विभागाकडे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. मंगळवारी स्वत: गट शिक्षण अधिकारी दिलीप खनके यांनी शाळेला भेट दिली असता, दिलीप मोंढे हा शिक्षक दारू पिऊन असल्याचे आढळून आले. ेगावातील नागरिक या शिक्षकाचे कारनामे सांगण्यासाठी शाळेत आले असता दिलीप मोंढे याने शाळेतून पळ काढला. त्यानंतर खणके यांनी सदर शिक्षकावर कोणतीही कार्यवाही न करता पंचनामावर असभ्य वर्तवणूक असल्याचा शेरा मारून नागरिकांना शांत केले. या शिक्षकावर कार्यवाहीची मागणी विठ्ठल शेंडे डॉ. प्रकाश खनके, मधुकर धुर्वे आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)जेव्हापासून दिलीप मोंढे हे शिक्षक कन्हाळगाव शाळेत रुजू झालेत, तेव्हापासून मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. येथील मुलांना साधी अक्षर ओळखही नाही. शिक्षक नेहमीच दारू पिऊन असतो. शाळा वेळेवर भरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. - विठ्ठल शेंडे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीशिक्षक दिलीप मोंढे हे शाळेत असभ्य वर्तन करुन मुलांच्या शिक्षणाचे नुकसान करीत आहे. शाळेत मद्यप्राशन करून येत असल्याबाबात वरिष्ठांकडे अहवाल पाठवून त्यांच्यावर कारवाई करु. - दिलीप खनके, गटशिक्षणाधिकारीदिलीप मोंढे या शिक्षकाची आठ दिवसांत बदली करण्यात न आल्यास शाळेला कुलूप ठोकण्यात येईल. या गावाचा विकास होण्याऐवजी येथील जि.प. शाळेतील मुले गावातच फिरताना पाहावयास मिळत आहे. या शिक्षकामुळे येथील मुलाचे आणि जीवनावर परिणाम होत आहे. अनेकदा तक्रारी देऊनही वरिष्ठ अधिकारी त्याची पाठराखण करीत असल्याचा प्रकार घडत आहे. तेव्हा मोंढे नामक शिक्षकाची बदली आठ दिवसात न केल्यास शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केले जाईल. डॉ. प्रकाश खनके, तालुका अध्यक्ष शिवसेना