शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे चाक मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्या तरी काही अटींवर मोठे उद्योग सुरू ठेवण्यास राज्य सरकारने ...

चंद्रपूर : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्या तरी काही अटींवर मोठे उद्योग सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र, मागील वर्षापासून सतत नुकसानीचा फटका भोगणाऱ्या ग्रामीण व तालुका स्थळावरील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची चाके मंदावली आहेत. त्यामुळे रोजगाराविना कामगार व सुशिक्षित बेरोजगारांचे हाल होत आहेत.

जिल्हा उद्योग केंद्राच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ३ हजार २८६ सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग आहेत. कोरोनामुळे यातील सुमारे दीड हजार उद्योगांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. निर्बंध उठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले तर नुकसानीचे भीषण चित्र पुढे येऊ शकते. मोठ्या उद्योगांनी निर्बंधाच्या काळातही उत्पादनासाठी कच्चा मालाची आयात करीत आहेत. पण, लहान उद्योगचालकांना हा खर्च परवडत नाही. चंद्रपूर औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या २० पैकी १६ उद्योग सुरू आहेत. कंपन्यांनीही कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या. यातील बरेच कामगार स्थायी आहेत. अनेकांना कामगार कायद्याअंतर्गत सोयीसवलती मिळतात. परंतु, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत या उद्योगांची रोजगार पुरविण्याची क्षमता कमीच आहे. सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत लादलेल्या निर्बंधांंमुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सुमारे पाच ते सहा कोटींच्या व्यवहाराला मोठा फटका बसल्याचा अंदाज सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

कच्चा माल व उत्पादन साखळी विस्कळीत

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात ५५ ते ६० हजार असंघटित कामगारांना रोजगार मिळतो. यामध्ये कृषी उत्पादनावर आधारित मूल्यवर्धन प्रक्रिया उद्योगांचाही समावेश आहे. पण, कच्चा माल व उत्पादनाची साखळी विस्कळीत झाली. त्यामुळे या उद्योगांची चाके बंद पडली. परिणामी, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. विक्रीअभावी भाजीपाला उत्पादकांचेही अर्थकारण कोलमडले आहे.

उद्योजक म्हणतात...

गेल्यावर्षीपासून जिल्ह्यातील उद्योग संकटात आहेत. उत्पादन झाले तर विक्री नाही आणि व्रिकी झाल्यास वसुली नाही, अशा दुष्टचक्रात उद्योजक सापडले आहेत. अशा परिस्थिती शासनाने पुन्हा निर्बंध सुरू झाले. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उद्योगांचाही पाठिंबा आहे. मात्र, सरकारने आर्थिक तरतूद केली पाहिजे.

-मधुसूदन रुंग्ठा, अध्यक्ष, एमआयडीसी, चंद्रपूर

तालुकास्थळावरील लघु उद्योगांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. खरे तर या उद्योगावर निर्भर असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. परंतु, वाहतूक, कच्चा माल, उत्पादन, विक्रीबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या. स्थिती केव्हा सुधारेल, याचीच आम्ही वाटत पाहत आहोत.

-राहुल वेगीनवार, चंद्रपूर

कोरोना साखळी तोडण्यासाठी जीवनाश्यक वस्तुंची दुकाने वगळता कापड व अन्य दुकाने १५ मेपर्यंत बंद आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाला. गतवर्षी झालेले नुकसान भरून निघाले नसताना पुन्हा ही आपत्ती आली आहे.

-शंकर अग्रवाल, चंद्रपूर

मी एमआयडीसीत कंत्राटी काम करीत होतो. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आठवड्यातून व पक्त तीन दिवस कामावर बोलाविल्या जात आहे. आधीच मजुरी जास्त नाही. शहरात दुसरे काम नाही. त्यामुळे सध्या ट्रालीवर फिरून शहरात फळे विकून कुटुंब चालवित आहे.

- फारूख पठाण, रहमतनगर, चंद्रपूर

उद्योगांसाठी कर्ज घेणारे चिंतित

जिल्ह्यातील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून कर्ज घेतले आहे. बऱ्याच जणांनी स्वयंरोजगारासाठी खासगी बँकांकडून भांडवल उभारले. सध्या हे उद्योग संकटात सापडले आहेत. कोरोना केव्हा जाणार याची काही खात्री नाही. त्यामुळे कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

तालुकानिहाय सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग व सुरू उद्योग टक्के

वरोरा १३५

चिमूर ११०

नागभीड ११७

बल्लारपूर १५१

सावली ३०

सिंदेवाही ५१

भद्रावती ११४

चंद्रपूर १५६८

मूल ६१६

पोंभुर्णा ७५

ब्रह्मपुरी १०४

कोरपना ६२

राजुरा ७४

गोंडपिपरी १३

जिवती ३६