शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

फोलिक अ‍ॅसिड गोळ्या देऊन नवविवाहित महिलेचे केले जाते स्वागत !

By admin | Updated: June 22, 2015 01:11 IST

शासन प्रत्येक नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा देण्यास कटिबद्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगवेगळे ....

पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्र : नावीन्यपूर्ण उपक्रम ठरत आहे इतरांसाठी प्रेरणादायीपोंभुर्णा : शासन प्रत्येक नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा देण्यास कटिबद्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगवेगळे कार्यक्रम राबवून प्रत्येक नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, याकरिता नेहमी प्रयत्नशील असते. अशाच प्रयत्नाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास धनगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रत्येक गावातील नवविवाहित महिलेला फोलिक अ‍ॅसिडच्या ३० गोळ्या वाटप करून त्यांचे स्वागत करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.डॉ. धनगे यांनी सांगितले की, मुलींच्या रक्ताचे प्रमाण हे कोणत्या ना कोणत्या कारणाने कमी होत असते. त्यामुळे ताप येणे, जेवण कमी करणे, द्विधा मानसिकतेत राहणे, विचारमग्न राहणे या सर्व बाबींवर फोलिक अ‍ॅसिड अत्यंत गुणकारी आहे. फोलिक अ‍ॅसिडची गोळी रोज एक वेळा जेवण केल्यानंतर नियमित घेतल्यास शरीरातील रक्ताचा पुरवठा वाढत असतो. त्यामुळे नवविवाहित महिला उत्साहित राहू शकतात, असे सिध्द झाले आहे. यामुळे आपण हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करून प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सोयी सुविधा लोकांपर्यंत पोहोचविणे व वेळोवेळी वेगवेगळे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित करून लोकांना आरोग्याबाबत जागृत करण्याचा प्रयत्न या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केला जात असल्याचे धनगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सिकलसेल तालुका पर्यवेक्षक प्रमोद राऊत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय ब्राह्मणे, फॉर्मासिस्ट नीलेश साऊरकर, आरोग्य सहायक बोढे, चौधरी उपस्थित होते. दरम्यान, सिकलसेलग्रस्त महिलांची गर्भजल तपासणी मोफत करण्याची मागणी परिसरातील महिलांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)