शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक संपदेच्या वापरात आपण चुकलो

By admin | Updated: April 10, 2016 00:46 IST

जिल्ह्यात वन, खनिज व जलसंपदा मुबलक प्रमाणात आहे. मात्र आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करु शकलो नाही.

सुधीर मुनगंटीवार : इरई पुनरूज्जीवनाच्या कामाला प्रारंभचंद्र्रपूर : जिल्ह्यात वन, खनिज व जलसंपदा मुबलक प्रमाणात आहे. मात्र आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करु शकलो नाही. पाणी जमिनीत मुरविण्यात आपण कमी पडलो. त्यामुळेच नद्यांची अवस्था बिकट झाली आहे. नद्या वाचविणे आता गरजेचे झाले आहे. त्यांच्या वापरात आपण चुकलो, असे प्रतिपादन वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग यांच्या वतीने आयोजित इरई नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम शुभारंभ व जलयुक्त शिवार अंतर्गत नवीन सयंत्राचे उद्घाटन शनिवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्र्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर होते. महापौर राखी कंचलार्वार, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, उपमहापौर वसंता देशमुख, अधिक्षक अभियंता जे. एम. शेख, जि. प. सभापती देवराव भोंगळे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने व महिंद्र्राचे मारुती माथुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, नद्या वाचविणे गरजेचे झाले आहे. इरई नदीपासून हे काम हाती घेतले असून नदी पुनरूज्जीवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. जलयुक्त शिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या सात जेसीबी मशीन्सचे उद्घाटन यावेळी पाहुण्यांंच्या हस्ते करण्यात आले. इरई नदीचे खोलीकरण व सौंदर्यीकरण यासाठी ८४ कोटी रुपयांचे नियोजन असले तरी या कामासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल, असे पालकमंत्री म्हणाले. जलसंधारण महामंडळ सरकारने पुनर्गठित केले असून त्यांचा निधी या कामासाठी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नदीपात्रातील गाळ तीन ते पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत मोफत देता येईल का यावर प्रशासनाने विचार करावा, असे ते म्हणाले.सिंचनाची सोय व प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठीच जलयुक्त शिवार हा कार्यक्रम असल्याचे आमदार नाना शामकुळे यांनी सांगितले. केवळ १ हजार ४५० कोटी रुपयात अडीच लाख शेतकऱ्यांच्या सहा लाख हेक्टर जमिनीला याच फायदा झाला. इरई नदीला संरक्षण भिंत होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.प्रस्ताविक जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. इरईचे खोलीकरण व सौंदर्यीकरणासाठी ८४ कोटी रुपयांचे नियोजन आहे. या मशीनच्या साहाय्याने ६३१ टीसीएम गाळ काढण्यात येणार असून हे काम ३१ मे पूर्वी होणे अपेक्षित आहे. यामुळे अडीच किलोमीटर नदी मोकळी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी तर उपस्थितांचे आभार सचिन झेंडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी) दूरगामी उपक्रम - अहीरजलयुक्त शिवार हा अतिशय नियोजनबद्ध व दूरगामी परिणाम करणारा कार्यक्रम असून केंद्र सरकारने या कामाची दखल घेतली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी सांगितले. इरई पुनरूज्जीवन, नाला खोलीकरण व बंधारे बांधकाम ही काळाची गरज आहे. भविष्यात शेती व पिण्यासाठी पाणी याच प्रयत्नातून उपलब्ध होणार आहे. इरई पुनरूज्जीवनाच्या कामात नागरिकांनीही आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.