शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

विरईत दहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

By admin | Updated: December 18, 2014 22:52 IST

विरई येथे पाणी समस्या गंभीर असून पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. विरईत पाच वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वित केली होती.

भेजगाव : विरई येथे पाणी समस्या गंभीर असून पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. विरईत पाच वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वित केली होती. परंतु ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वीज देयक थकित राहिले. वीज देयकाच्या थकित रकमेमुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा दहा दिवसांपूर्वीपासून बंद केला आहे. त्यामुळे विरईवासीयांचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून परिसरातील बोरचांदली व १९ गावांकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विरईत पाणी पुरवठा सुरू झाला. अन् विरईची जनता सुखावली. मात्र अल्पावधीतच या योजनेने रंग बदलविणे सुरू केले. त्यामुळे विरईत पाणी प्रश्न पेटला. या योजनेचे पाणी वाटपाचे काम कंत्राटारामार्फत चालत असल्याचे समजते. ठेकेदाराच्या कामचुकार व पैसे खाऊ धोरणामुळे विरईत चार दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो. परंतु तिथेही मुबलक पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य ठिकाणापासून विरई गाव अगदी जवळ आहे. विरईत जर अशी स्थिती असेल तर उर्वरित गावाची काय अवस्था असेल. गावातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व पाणी पुरवठा कंत्राटदारांना माहिती दिली. परंतु यांचा काहीही उपयोग झालेला नाही. अधिकारी व कंत्रादार आपण नियमित पाणी पुरवठा करत असल्याचा आव आणून मूग गिळून गप्प बसले आहेत.गावातील हातपंपाची व विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने हातपंपाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हिवाळ्यातच ही स्थिती आहे तर पुढे उन्हाळ्यात परिस्थिती कशी असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाच्या पाणी पुरवठा विभाग व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)