शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची न्यायासाठी भटकंती

By admin | Updated: January 24, 2015 22:51 IST

येथील विनायक विठू निमगडे यांच्या सावतडा रिठ येथील शेत सर्व्हे क्रमांक ४२ मधून बेकायदेशीररीत्या पांदण रस्त्याचे काम २० नोव्हेंबर २०१२ ला स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत झाले आहे.

शेतातून बळजबरीने रस्ता : शेतकऱ्यावर अन्यायगेवरा : येथील विनायक विठू निमगडे यांच्या सावतडा रिठ येथील शेत सर्व्हे क्रमांक ४२ मधून बेकायदेशीररीत्या पांदण रस्त्याचे काम २० नोव्हेंबर २०१२ ला स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत झाले आहे. काम सुरू असताना शेतकऱ्याने तलाठी रेकॉर्डनुसार जुना पांदण रस्ता सर्व्हे नं. ८८ मध्ये काम करण्याची विनंती केली. मात्र, तत्कालीन ग्रामसेवकाने शेतकऱ्यांची न ऐकता शेतीतून रस्ता तयार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरु असून याकडे मात्र, कोणताही अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्याला पीक घेण्यासापासून वंचित राहावे लागत आहे. पीडित शेतकऱ्याने अनधिकृत रस्ता बांधकामाची लेखी तक्रार संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदार यांना तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. मात्र, कोणतीच कार्यवाही न झाल्याने पीडित शेतकऱ्याने मानव अधिकार आयोगाकडे दाद मागितली. तेव्हा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सुनावणीत जाब विचारले. तेव्हा तत्कालीन उपजिल्हाधिकारी मग्रारोहयो नान्हे यांनी शेतकऱ्याला उलट वेटीस धरुन झालेले काम योग्यच असल्याचा आव आणून कैफियत फेटाळून लावली. शेवटी विनायक निमगडे यांनी तक्रार निवारण अधिकारी, रोहयो चंद्रपूर यांच्याकडे १८ नोव्हेंबर २०१३ रोजी तक्रार दाखल केली. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २६ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती सावली येथे तक्रार निवारण प्राधिकारी (मनरेगा) चंद्रपूर यांनी प्रत्यक्ष सुनावनी घेतली. त्याबाबतचा निर्णय देऊन पत्रान्वये संबंधित यंत्रणेला कळविले.सुनावणीदरम्यान पीडित शेतकऱ्याने मूळ पांदण रस्ता सर्व्हे नं. ८८ सोडून सर्व्हे नं. ४२ मधून (खासगी) मातीकाम केल्याने ०.४० हेआर जमिनीचा मोबदला द्यावा व झालेल्या कामाची चौकशी करुन न्याय मागीतला. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. (वार्ताहर)