शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चिंतलधाबा येथे ‘व्हायरल फ्लू’चे थैमान

By admin | Updated: March 21, 2016 00:37 IST

वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील ...

मुले व वृद्धांसह ५० जणांना ग्रासलेपोंभुर्णा : वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील जवळपास ५० नागरिकांना ‘व्हायरल फ्ल्यू’ची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना खाटेवरून उटणेही शक्य होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा या गावामध्ये शनिवारी २४ रुग्णांना व्हायरल फ्ल्यूची लागण झाली. त्यात त्यांना पायाच्या घुडग्याच्या जाईंडमध्ये दुखणे, पाय सरळ न होणे अशाप्रकारची लक्षणे सुरू झाली. दुसऱ्या दिवशी रविवारी परत २६ रुग्णांची वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यात लहान मुलांपासून तर वृद्धांना व्हायरल फ्ल्यूने ग्रासले आहे. गावातील एका इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याला सुद्धा आजाराने ग्रासले असल्याने त्याला खाटेवरून उठणे कठीण झाले आहे. ‘त्या’ विद्यार्थ्यांचा मंगळवारी दहावीचा शेवटचा पेपर आहे. परीक्षेला न गेल्यास त्याचा शैक्षणिक वर्ष वाया जाईल की काय, अशी कुटुंबातील व्यक्तींमध्ये भीती निर्माौण झाली आहे. व्हायरल फ्ल्यूने ग्रस्त रूण खाटेवरून उठू शकत नसल्याने पोंभूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना या बाबीची गावकऱ्यांनी माहिती दिली. परंतु, या ठिकाणी डॉक्टर न येता एमपीडब्ल्यू व परिचारिकेच्या माध्यमातून गावातील समाजभवनामध्ये तात्पुरता उपचार सुरू केले आहे. मात्र आरोग्य विभागाकडून पाहीजे तसे उपचार मिळत नसल्याने काही रुग्ण खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.पाथरी परिसरात अतिसारची लागणपाथरी येथे नळाच्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावकऱ्यांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. दररोज तीन ते चार रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथे उपचाराकरीता येत आहेत. मात्र योग्य औषध साठा उपलब्ध नसल्याने काहींना रुग्णांना गडचिरोली हलविले आहे.गावकरी म्हणतात, चिकनगुणियाआरोग्य विभागाचे कर्मचारी व्हायरल फ्ल्यू म्हणून सांगत असले तरी गावकरी मात्र सदर साथ ही चिकनगुणियाची असल्याचे सांगत आहेत. रूग्णांमध्ये पुन्हा वाढच होत असून रुग्णांचे हातपाय धरले तरी तो खाटेवरून उठू शकत नाही. रुग्णाला उठवल्यावर चालता येत नाही. त्यामुळे या गावातील अनेक रुग्ण खाटेवरच पडून असल्याचे वास्तव दिसत आहे. या प्रकाराकडे आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम मोहुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. चिंतलधाबा येथे व्हायरल फ्ल्यूची लागण झाली आहे. व्हायरल फ्ल्यू हा विषाणूजन्य आजार असून रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. चिंतलधाबा गावात आरोग्य कॅम्प लावण्यात आले असून आजारग्रस्तांच्या रक्ताचे नमूने घेतले जात आहेत. गावकऱ्यांनी भीती बाळगू नये, ही परिस्थीती दोन दिवसांत दूर होईल. - डॉ. विलास धनगे, वैद्यकीय अधिकारी, पोंभुर्णा.