घोसरी उपक्षेत्रातील गावे धुरमुक्त

By Admin | Updated: January 1, 2017 01:15 IST2017-01-01T01:15:57+5:302017-01-01T01:15:57+5:30

वनविभागाच्या पुढाकारीने लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गॅस योजना मंजुर करुन एक वर्षापर्यंत अनुदानातुन रिफीलिंग उपलब्ध करुन दिल्यामुळे

Villages in Ghosari Sub-region Dhur Mukt | घोसरी उपक्षेत्रातील गावे धुरमुक्त

घोसरी उपक्षेत्रातील गावे धुरमुक्त

घोसरी : वनविभागाच्या पुढाकारीने लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गॅस योजना मंजुर करुन एक वर्षापर्यंत अनुदानातुन रिफीलिंग उपलब्ध करुन दिल्यामुळे घोसरी उपक्षेत्रातील दिघोरी, पिपरी देशपांडे, घोसरी, पिपरी दिक्षीत या गावातील महिलांचा सरपणाचा ताण कमी होवुन अवैध वृक्षतोडीला आढा बसला व सामान्य गरीब कुंटूबाना गॅसचे वितरण केल्यामुळे ही गावे धुरमुक्त होत आहेत.
अवैध वृक्षतोडीला आळा बसावा व जंगलातील सरपनाचा ताण कमी होवून जंगलाचे संवर्धन करण्याकरिता वनविभागाच्या पुढाकाराने संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. दिघोरीचे अध्यक्ष पुंडलिक वाकुडकर यांनी ‘घर तिथे वृक्ष’ या संकल्पनेतून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करुन गावकऱ्याच्या सहभागातुन झाडांची देखभाल करण्याचा संकल्प केलेला आहे
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून येथील एका समितीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला समितीच्या सदस्याकडून १०० रू प्रति स्वयंखचार्ने श्रमदानातून लोखंडी जाळीचे वितरण करण्यात आले. त्यामुळे झाडांचे संरक्षण करण्यात आले.
जंगलातील हिंसक वन्यप्राण्यामुळे मानव, वन्यप्राणी संघषार्चे प्रमाण कमी होण्याच्या दृष्ट्रीने वृक्षतोड होवू नये, म्हणून गावातील २६९ कुंटुबापैकी अनु.जाती जमाती २०२ लाभाथ्यार्ना गॅस कनेक्शन देण्यात आले. तसेच घोसरी वनव्यवस्थापन समितीतर्फे इतर मागासवर्गियांना, अनु. जातीच्या २९ लाभार्थ्यांना, जमाती प्रवगार्तील २४ लाभाथ्यार्ना २५ टक्के अनुदानातून गॅस कनेक्शन देण्यात आले.
मात्र येथील काही कुंटंब अजूनही चुलीवरतीच स्वयंपाक करत आहेत. आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेवुन त्यांनासुध्दा कनेक्शन देण्याचे मान्य केलेले आहे. जंगलात सरपन गोळा करताना मानव वन्यप्राणी संघर्ष टाळन्याकरिता सर्व सामान्य कुटुंबाना गॅसचा लाभ रेशन कार्डाच्या आधारावर घेता येणार आहे .तसेच बायोगॅस , शौचालयातून बायोगॅस संच उपलब्ध झाले आहे .ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन शौचालये बांंधकाम प्रगतीपथावर असुन निरोगीमय जिवनाची कास धरुन प्रत्येकानी गॅसचा वापर करुन वृक्ष व जंगलाचे रक्षन करावे असे आवाहन उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी केले आहे. ( वार्ताहर)

Web Title: Villages in Ghosari Sub-region Dhur Mukt