शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी स्थापणार गावनिहाय समित्या

By admin | Updated: May 31, 2015 01:54 IST

दारुबंदी हा विषय तात्पुरता नसून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा आहे. यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, त्याशिवाय प्रभावी यश दिसणार नाही.

वित्तमंत्री म्हणतात : पावसाळी अधिवशेनात कायद्यात बदल करणारचंद्रपूर: दारुबंदी हा विषय तात्पुरता नसून दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा आहे. यात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, त्याशिवाय प्रभावी यश दिसणार नाही. हे लक्षात घेऊन दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी गावनिहाय समित्या तयार केल्या जातील. जिल्हाभरातील अंदाजे दोन हजार समित्यामध्ये २० हजार महिला व ८४७ सरपंचांचा समावेश असेल. या समित्यानना कायदेशिर अधिकारही दिले जातील, असा मानस वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी दारुबंदी अंमलबजावणी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.पी. कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सुरेंद्र्र मनपिया, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी व पोलीस अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रशासनाला निर्देश नेताना ना.मुनगंटीवार म्हणाले, दारुबंदी संबंधी नागुिरकांमध्ये जनजागृती करायला हवी. ग्राम पंचायत व पंचायत समिती स्तरावर व्यसनमुक्तीचे मेळावे घेण्यात घेतले जावे, अशी अपेक्षा त्याननी व्यक्त केली.पोलीस विभागाने दारुबंदी अंमलबजावणीसाठी विशेष शाखा स्थापन करण्याच्या सुचना त्याननी केल्या. तक्रार निवारणासाठी व तक्रारदाराला फिडबॅक देण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअर तयार करता येईल का यावर विचार करावा, असे त्यांनी सुचविले. पोलीस विभागाने दारु विकणाऱ्यांना पाठीशी न घालता कडक कारवाई करावी. वर कडक कारवाई करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ही लढाई सोपी नसल्याने एकत्रितपणे लढण्यासाठी त्यांनी यंत्रणेला आवाहन केले.दारूबंदीसंर्भातील कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत ८४८ कारवाया करण्यात आल्या असून ५५ लाख रूपयांची दारु जप्त केली आहे. टोल फ्री नंबरवर ५१६ कॉल प्राप्त झाले असून ब-याच ठिकाणी कारवाई यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉल करणा-या व्यक्तीला काय कारवाई झाली याबाबत फिडबँक देण्याचे काम सुरु केल्याचे ते म्हणाले. मद्य चाचणी प्रयोग शाळा चंद्रपुरात असावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. बैठकीला सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)ंपावसाळी अधिवेशनात कायद्यात बदलना. मुनगंटीवार म्हणाले, दारूबंदीसंदर्भातील सध्याच्या प्रचलित कायद्यामुळे या अवैध व्यवसायात गुंतलेल्यांवर कडक कारवाई होत नाही. कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन हे अवैध व्यावसायिक लवकर तुरूंगाबाहेर येतात. दारु विकणे व वहन करणे यासाठी शिक्षेची तरतूद कमी आहे. हा अडथळा लक्षात घेता, येत्या पावसाळी अधिवेशनात दारूविक्रसंर्भातील कायद्यामध्ये मोठया प्रमाणात बदल करुन कडक शिक्षेची तरतूद करण्यात येईल.