कन्यका नागरी बँकेच्या अध्यक्षपदी विजय आर्इंचवार अविरोध

By Admin | Updated: March 10, 2016 01:28 IST2016-03-10T01:28:21+5:302016-03-10T01:28:21+5:30

श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. विजय आर्इंचवार यांची अविरोध निवड करण्यात आली.

Vijay Organized as the Chairman of Kanyakya Nagri Bank, remains unconstitutional | कन्यका नागरी बँकेच्या अध्यक्षपदी विजय आर्इंचवार अविरोध

कन्यका नागरी बँकेच्या अध्यक्षपदी विजय आर्इंचवार अविरोध

उपाध्यक्षपदी : दीपक गुंडावार
चंद्रपूर : श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. विजय आर्इंचवार यांची अविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी दीपक गुंडावार यांची वर्णी लागली.
बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरीता प्राधीकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था राजेंद्र कौसडीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी १२.३० वाजता घेण्यात आली. सभेत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरीता कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी १ वाजेपर्यंत अध्यक्ष पदाकरीता डॉ. विजय आर्इंचवार यांचे नामनिर्देशन पत्र आणि उपाध्यक्ष पदाकरीता दीपक गुंडावार यांचे नामनिर्देशन पत्र सादर झाले.
नामनिर्देशन पत्राची छाननी करून दुपारी १.१५ वाजता सभेला माहिती देण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने अध्यक्षपदी डॉ. विजय आर्इंचवार आणि उपाध्यक्षपदी दीपक गुंडावार यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांचे आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Vijay Organized as the Chairman of Kanyakya Nagri Bank, remains unconstitutional