वाहतूक विस्कळीत : वरोरा-वणी मार्गावरील घटनावरोरा : वणी-वरोरा रस्त्यालगतच्या शेंबळ गावाच्या शिवारात नादुरस्त ट्रक मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभा होता. मात्र रविवारी दुपारी ट्रकला अचानक आग लागली. त्यामुळे वरोरा-वणी मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती.ट्रक नादुरूस्त असल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अचानक ट्रकला आग लागली. जोरदार वारा असल्याने संपूर्ण ट्रकने पेट घेतला. आगीचे लोंढे व धुर मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरत होते. त्यामुळे वणी-वरोरा मार्गावरील वाहतून ठप्प झाली होती. वरोरा पोलीस व जी.एम.आर.एम.को व वरोरा नगर पालिकेचे अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशामक दलाचे योगेश साठोने, डीसीपीओ प्रशांत खापने, फायरमॅन अविनाश गोळघाटे आदींनी यासाठी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)६० हजाराची खस जळून खाकवरोरा शहरातील कसमपंजा वॉर्डात रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अंगणात असलेली ६० हजार रूपयाची कुलरची खस जळून खाक झाली. ही आग पसरत जाऊन शेजारच्या घरांनाही लागल्याने काही जणांच्या घराच्या खिळक्या जळाल्या असून मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर वरोरा नगरपालिकेचे अग्नीशमक दल वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण कळले नसून नबी शेख यांच्या घरी किरायाने राहत असलेल्या भाडेकरूची ती खस होती. मात्र भाडेकरूचे नाव कळू शकले नाही.
उभ्या ट्रकला आग
By admin | Updated: March 28, 2016 00:49 IST
वणी-वरोरा रस्त्यालगतच्या शेंबळ गावाच्या शिवारात नादुरस्त ट्रक मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला उभा होता.
उभ्या ट्रकला आग
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}