शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातही प्रेमविरात ‘व्हॅलेंटाइन वीक’चा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST

चंद्रपूर : पाश्चिमात्य संस्कृतीतील ‘व्हॅलेंटाइन वीक’ आता आपल्या देशातही साजरा होऊ लागला आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन डेच्या विविध दिनविशेषांना ...

चंद्रपूर : पाश्चिमात्य संस्कृतीतील ‘व्हॅलेंटाइन वीक’ आता आपल्या देशातही साजरा होऊ लागला आहे. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन डेच्या विविध दिनविशेषांना सुरुवात होताच प्रेमवीरांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. अनेक युवा आपल्या स्वप्नातील राजकुमारीला मनातील भावना सांगण्यासाठी हा उत्सव साजरा करताना दिसून येत आहेत. मात्र, कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने व्हॅलेंटाइन आठवड्यात गजबजून राहणारे कॉलेज कट्टे विद्यार्थ्यांविना ओस दिसून येत आहेत.

फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमवीरांसाठी पर्वणीच असते. पूर्वी प्रेम हा शब्द उच्चारताच कान टवकारले जायचे. मात्र, दिवसेंदिवस आपल्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा वाढत असल्याने प्रेमदिनाच्या संकल्पनेतही बदल होत आहे. त्यामुळे प्रेमीयुगुल मोठ्या आतुरतेने फेब्रुवारी महिन्याची वाट बघत असतात. अनेकांना या आठवड्यात जीवनभराचे साथीदारही मिळत असतात, तर अनेकांचा प्रेमभंगही होत असतो. त्यामुळे व्हॅलेंटाइन वीक हा बहुतांश तरुणांच्या कायम आठवणीत राहणारा उत्सव आहे. साधारणपणे महाविद्यालयात प्रेमाला बहर येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे महाविद्यालये सुरू झालेच नाहीत. यावर्षी व्हॅलेंटाइन डेनंतर महाविद्यालये सुरू होणार असल्याने महाविद्यालयीन युवकांना हा दिवस साजरा करण्यास अडचण जाणार आहे. दरवर्षी महाविद्यालयीन युवक व्हॅलेंटाइन डे मोठ्या धूमधडाक्यात साजरा करायचे; परंतु यंदा व्हॉटस्‌ॲप, फेसबुक सोशल मीडियावरच व्हॅलेंटाइन साजरा करावा लागणार आहे.

बॉक्स

व्हॅलेंटाइन हे रोमन संत

संत व्हॅलेंटाइन हे रोमन कॅथलिकपंथीय होते. या प्रेमळ संताच्या नावावर व्हॅलेंटाइन डे हा उत्सव जगभर साजरा केला जातो. मुळात प्रेम हे फक्त प्रेयसीवरच केले जात नाही. आपल्या सर्वांची हृदयस्थ व्यक्ती ही आई, वडील, भाऊ, बहीण, चिमुकली मुले किंवा पाळीव प्राणीसुद्धा होते. संशोधनानुसार प्रेम एक भावना आहे. ती भावना व्यक्तीतून प्रकट झालीच पाहिजे; परंतु आजचे युवा केवळ प्रेयसीवरच प्रेम करण्याच्या आविर्भावात हा सण साजरा करतात.