शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पशु वैद्यकीय दवाखान्यातील पदे रिक्त

By admin | Updated: January 31, 2016 01:01 IST

सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी वर्गाची संख्या अधिक आहे. त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे.

गुंजेवाही : सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी वर्गाची संख्या अधिक आहे. त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजे शेती हाच आहे. शेती व्यवसायाकरिता बैलजोडीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. या पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात व ग्रामीण भागात पशुवैद्यकीय चिकित्सालयाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सिंदेवाही पंचायत समितीमधील अनेक पशु चिकित्सालयातील पदे रिक्त आहेत.पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हे पद रिक्त तसेच सिंदेवाही पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ चे पशुधन विकास अधिकारी, मरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ पशुधन विकास अधिकारी व दोन परिचर, गुंजेवाही येथील आधारभूत पशुसुधार केंद्र येथील परिचर पद इत्यादी रिक्त पदे भरण्याबाबत शासन उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन संकटात सापडले आहे.तालुक्यातील शेतकरीवर्गाकडे बैल, गाई, म्हशी-शेळ्या आदी पाळीव पशु आहेत. या पशुधनावर रोगांचा प्रादूर्भाव होऊन त्यांची जीवितहानी होऊ नये, यासाठी तालुक्यातील गुंजेवाही, नवरगाव, वासेरा, सिंदेवाही, मरेगाव, नांदगाव, पळजगाव (जाट) व कुकडहेटी येथे पशुवैद्यकीय चिकित्सालय आहेत. मात्र सदर दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व परिचर पदे रिक्त असल्यामुळे पशुधनावर त्याचा विपरित परिणाम होताना दिसून येत आहेत. काही ठिकाणी परिचरच्या भरोशावर सदर पशुधन दवाखाना सुरू आहे. याचा परिणाम पशुधनावर होताना दिसून येत आहे.सदर रिक्त पदाबाबत पंचायत समिती स्तरावरुन वरिष्ठस्तरावर अनेकदा पत्र व्यवहार करूनही त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली जात आहे. तसेच भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ अन्वये सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांना नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सेवा द्यावी लागते. त्यांना स्वतंत्रपणे पशुसेवा देण्याचा अधिकार नसल्याने त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासन स्तरावरुन पशुवैद्यकीय दवाखाण्यात औषध पुरवठा करणे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरावर खासगी दवाखान्यात उपचार करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करण्याची पाळी आली आहे.