कोरोनाविरूद्ध उस्पुर्त आणि कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:27 AM2021-04-11T04:27:50+5:302021-04-11T04:27:50+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्री ८ वाजतापासून ‘विकेंड लॉकडाऊन’ लागू केला. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ...

Uspurt and strictly closed against the corona | कोरोनाविरूद्ध उस्पुर्त आणि कडकडीत बंद

कोरोनाविरूद्ध उस्पुर्त आणि कडकडीत बंद

Next

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्री ८ वाजतापासून ‘विकेंड लॉकडाऊन’ लागू केला. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजतापर्यंत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे अथवा फिरण्यास कलम १४४ अन्वये प्रतिबंध घालण्यात आला. बंदला चंद्रपुरातील व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला होता. मात्र, शहरातील मेडिकल स्टोअर्स व जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सोडल्यास संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आला.

भरला नाही भाजीबाजार

प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून भाजीबाजार भरविण्यास प्रशासनाने परवागनी दिली होती. मात्र, कारवाईच्या धास्तीने आज शहरातील भाजीबाजार बंद ठेवण्यात आला. त्यामुळे बºयाच ग्राहकांना घरी परतावे लागले. पळविक्रेत्यांना परवानगी असताना गोल बाजारातील सर्वांनीच दुकाने बंद ठेवली होती.

राज्य महामंडळाच्या ५५ बसफेऱ्या रद्द

चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र वाहतूक सुरू होती. प्रवाशी मिळण्याची शक्यता नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने आज ४५ बसफेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड बसस्थानकावरून शुकशुकाट दिसून आला. शेकडो प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. चंद्रपुरात ऑटोरिक्षा सुरू होते. पण, प्रवासी नाही, असे चित्र दिसून आले.

मार्निंग वॉकचे मार्ग बदलले

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गाने दररोज मार्निंग वॉक करणाºया बºयाच नागरिकांनी आज मार्ग बदलविले. त्यामुळे सकाळी गर्दी दिसली नाही. विकेंड लॉकडाऊनला व्यापाºयांचा विरोध आहे. मात्र, राज्य सरकार सोमवारी दिलासा देणारा निर्णय घेईल, या आशेने दुकाने कडकडीत बंद ठेवली होती.

मास्क न घालणाºया युवकांना तंबी

बसस्थानकापासून गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावर काही दुचाकीधारक विनामास्क पिरताना आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली तर काही युवकांना तंबी देऊन सोडून दिले.

केंद्र सरकारविरूद्ध शहर काँग्रेसची निदर्शने

कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असताना केंद्र सरकारकडून पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद आहेत. मात्र, ‘लस उत्सव साजरा करा’ अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शिवाजी चौक, गिरनार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट, वरोरा नाका व बंगाली कॅम्प चौकात मूक निदर्शने केली. शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, प्रसन्ना शिरवार, कुणाल चहारे, मोहन डोंगरे पाटील, पप्पू सिद्दीकी, इरफान शेख, राहिल कादर शेख, केतन दुर्सेलवार, कासिफ अली, मोनू रामटेके, आकाश तिवारी, रूपेश वासेकर, मीनल शर्मा, वैभव यरगुडे, अंकूर तिवारी सहभागी झाले होते.

Web Title: Uspurt and strictly closed against the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.