शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामात चोरीच्या रेतीचा वापर

By admin | Updated: April 10, 2016 00:59 IST

शासकीय कामात खनिज उत्खननाचा परवाना न घेता चोरीच्या रेतीचा वापर होत आहे.

तहसीलदारांकडून चौकशी : कारवाईचे आश्वासनकोरपना : शासकीय कामात खनिज उत्खननाचा परवाना न घेता चोरीच्या रेतीचा वापर होत आहे. कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथील कामाची कोरपना तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. तहसीलदार पुष्पलता कुमरे यांनी तक्रारीची दखल घेऊन कामाच्या स्थळी भेट दिली व ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.नांदाफाटा येथे दलित वस्ती अंतर्गत ६ लाख ३० हजार रूपयांच्या सिमेंट कांक्रीट रस्त्याचे काम वॉर्ड क्रमांक ५ मध्ये सुरू आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी इरई बोरगाव नदीतील काळ्या रंगाची रेती चोरून काम सुरू असल्याची तक्रार राजू काळे यांनी कोरपनाच्या तहसीलदार पुष्पा कुमरे यांच्याकडे केली. कुमरे यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन गुरूवारी कामाच्या स्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच पाच-सहा ट्रॅक्टर रेती जप्त केली. कोरपना तालुक्यात अनेक ग्रामपंचायती व पंचायत समिती स्तरावरील बांधकामात विना खनिज परवान्याचा रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. यामुळे नदी नाल्याचे खोलीकरण होत असून भविष्यात पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तहसीलदार पुष्पा कुमरे यांनी चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर व दोषी शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारकर्ते राजू बाळकृष्ण काळे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)