शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: April 9, 2016 01:26 IST

कोरपना तालुक्यातील मोठा सिमेंट प्रकल्प असलेल्या मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीला कोरपना तहसील कार्यालयाने शुक्रवारी अखेर टाळे ठोकले.

मुर्ली अ‍ॅग्रोला टाळे : ४०० स्थायी तर ६०० अस्थायी कामगार अधांतरीरत्नाकर चटप नांदाफाटाकोरपना तालुक्यातील मोठा सिमेंट प्रकल्प असलेल्या मुर्ली अ‍ॅग्रो सिमेंट कंपनीला कोरपना तहसील कार्यालयाने शुक्रवारी अखेर टाळे ठोकले. मागील अनेक दिवसांपासून येथील कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अनुत्तरीत असताना दुसरीकडे शासनाचा कर न भरल्याने सदर कारवाई झाल्याचे समजते. यामुळे कंपनीत काम करणाऱ्या ४०० स्थायी आणि ६०० अस्थायी कामगारांवर उपासमारीची टांगती तलवार दिसत आहे.यापूर्वी वेजबोर्डनुसार वेतन न मिळणे, कंपनीचे उत्पादन ठप्प होणे आणि वेतनात असलेली अनियमितता कामगारांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती. सहा ते सात महिन्याआधी कामगारांनी आंदोलन करून काही महिन्याचे वेतन मिळवून घेतले. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे दिसत आहे. या कंपनीत स्थानिक तसेच परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आहे. तर काही कामगार परजिल्ह्यातून किरायाच्या खोलीत राहून आपला संसार चालवित आहे. कंपनीची स्थापना झाल्यानंतर नजीकच्या शेतकऱ्यांना रोजगाराची संधी मिळेल आणि आयुष्याची भाकर शोधता येईल, अशी आशा होती. मात्र हाताला काम मिळत नसल्याने स्थानिक युवकांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली दिसत आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी दिल्या तर काहींना नोकरीचे आमीषही देण्यात आले. परंतु कंपनीचे कामकाज सुरळीत नसल्याने वेतनाचा प्रश्न स्थानिकांना भेडसावत आहे. कंपनीत कामगारांना मुलभूत सुविधा देण्यात याव्या, यासाठी कामगार संघटनांनी यापूर्वी आंदोलने केली खरी, मात्र अद्यापही कामगारांना न्याय मिळाला नाही. पक्षीय राजकारणातून श्रेय लाटण्याची धडपड कामगार नेत्यांमध्ये अधिक दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या कंपनीमध्ये कामगारांना राहण्याची, पाण्याची, आरोग्य आदी सुविधा नाही. त्यामुळे स्वत: खर्च करून मिळेल त्या वेतनात कामगार काम करीत आहे. कंपनीला टाळे ठोकल्याने कंपनी कामकाज बंद होईल काय, अशी चर्चा कामगारांमध्ये आहे. आतील मुख्य दाराला टाळे ठोकले असल्याने कामगार बाहेरूनच नियमित हजेरी बुकात स्वाक्षरी करून परत येत आहे. उल्लेखनीय बाब अशी की एवढी मोठी कारवाई झाल्यानंतरही याबाबत प्रशासन सुस्त असुन कामगारांबाबत कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही, असे कामगारांचेच म्हणणे आहे.