शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांऐवजी अनधिकृत व्यक्ती देताहेत लर्निंग लायसन्सची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 05:00 IST

मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व याबाबत माहिती असावी, यासाठी उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलीली परीक्षा देणे अनिवार्य आहे. कोरोनामुळे आता आधार कार्डच्या आधारे ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी तक्रारी : उमेदवार व नेट कॅफेवर कायदेशीर कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आधार कॉर्डच्या आधारे घरी बसूनच शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) देण्याची सोय १४ जूनपासून सुरू केली. मात्र काही ठिकाणी शिकाऊ उमेदवारांऐवजी अनधिकृत व्यक्ती लर्निंग लायसन्सची परीक्षा देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बोगस अधिकारी परीक्षा देत असल्याचे आढळून आल्यास त्यावर पोलीस कार्यवाही केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे. मोटार वाहन नियम ११ अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व याबाबत माहिती असावी, यासाठी उमेदवारास केंद्र शासनाने विहीत केलीली परीक्षा देणे अनिवार्य आहे. कोरोनामुळे आता आधार कार्डच्या आधारे ऑनलाइन परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स काढण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, अनेक उमदेवारांच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्ती बसून परीक्षा देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात जर उमेदवाराच्या ठिकाणी अनधिकृत व्यक्ती आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणत्याही नेट कॅफे, सेतू केंद्रानी असा प्रकार करु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. 

लायसन्स कायमस्वरुपी अपात्रnलर्निंग लायसन्स काढताना अनधिकृत व्यक्ती आढळून आल्यास दोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपी आपत्र ठरणार आहे. तसेच ज्या महा इ-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे सदर सुविधेचा गैरवापर करताना आढळून येतील, अशा संस्थाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या सावटात नागरिकांची सोय व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र उमेदवाराऐवजी अनाधिकृत व्यक्ती परीक्षा देत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणी आल्या आहेत. जिल्ह्यात असे आढळून आल्यास उमेदवारांवर तसेच संबंधित नेट कॅफेवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्या उमेदवाराचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. आयपी एड्रेस ट्रेस करण्यात येणार आहे. एकाच आयपी एड्रेसवरुन परीक्षा होत असल्याचे आढळून आल्यास त्याठिकाणी लक्ष ठेवण्यात येणार आहे.- किरण मोरे,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर

गोपनीय पथकांची नियुक्तीलर्निंग लायसन्स काढताना उमेदवाराऐवजी अनधिकृत व्यक्ती लर्निग लायसन्सची परीक्षा देवू नये, म्हणून चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे गोपनिय पथक गठित करण्यात आले आहे. हे पथक महा इ-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, इंटरनेट कॅफे येथे डमी उमेदवार पाठवून पडताळणी करणार आहेत. यामध्ये दोषी आढळल्यास त्या उमेदवारावर तसेच संबंधित नेट कॅफेवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस