तीन वाहनांच्या अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:41+5:30

रवी भोयर नावाचे व्यक्ती गोंदिया येथून दोन दुधाळू म्हशी घेवून मूल मार्गाने चंद्र्रपूरकडे येत होते. तर भद्रावती येथून मूल मार्गाने स्कूल बसने एक कुटुंब अस्थिविसर्जनासाठी मार्कंडा (देव) येथे जात होते. दरम्यान म्हशी घेवून येणाऱ्या वाहनाला दुचाकी वाहनाने ओव्हरटेक करून समोरून येणाºया स्कूल बसला जबर धडक दिली.

Two killed in a three-vehicle crash | तीन वाहनांच्या अपघातात दोन ठार

तीन वाहनांच्या अपघातात दोन ठार

ठळक मुद्देजानाळा येथील घटना : जखमींना सामान्य रूग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चंद्रपूर-मूल महामार्गावरील जानाळा गावाजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोन दुचाकीस्वार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. शिवाय दोन म्हशींचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२. ३० वाजता घडली. प्रफुल्ल सलोटे व प्रीतम सुरेश सेजोडे रा. लोहारा कॅम्प अशी मृतकांची नावे आहेत.
रवी भोयर नावाचे व्यक्ती गोंदिया येथून दोन दुधाळू म्हशी घेवून मूल मार्गाने चंद्र्रपूरकडे येत होते. तर भद्रावती येथून मूल मार्गाने स्कूल बसने एक कुटुंब अस्थिविसर्जनासाठी मार्कंडा (देव) येथे जात होते. दरम्यान म्हशी घेवून येणाऱ्या वाहनाला दुचाकी वाहनाने ओव्हरटेक करून समोरून येणाºया स्कूल बसला जबर धडक दिली. त्यामुुळे स्कूलबस अनियंत्रित होऊन म्हैस वाहतूक करणाºया वाहनाला धडक देवून झाडाला आदळली. चालकाने सर्तकता बाळगत बसमधून उडी घेतल्याने जीव वाचला. दरम्यान, मागून येणाºया एका दुचाकीला वाहन वाहन आदळल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले तर दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे. रवी भोयर, श्रीकांत राऊत, निलेश मांडे यांच्यासह स्कूलबसमधील सहाजण जखमी झाले. पोलिसांनी गंभीर जखमींना सामान्य रूग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Two killed in a three-vehicle crash

टॅग्स :Accidentअपघात