शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोन ठार

By admin | Updated: April 14, 2017 00:45 IST

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार-सिंदेवाही मार्गावरील वळणावर ट्रक-दुचाकीमध्ये बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास धडक झाली.

एक गंभीर : ट्रक-दुचाकीची भीषण धडकनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील सरडपार-सिंदेवाही मार्गावरील वळणावर ट्रक-दुचाकीमध्ये बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास धडक झाली. या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला असून दुसरा जखमी व्यक्ती उपचारादरम्यान मरण पावला. तिसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये नानाजी रामा मडावी (५५) व रवी दादाजी दडमल (२६) यांचा समावेश आहे. दुचाकीवरील तिसरा अनिल वसंता टेकाम (२७) या युवकाला गंभीर दुखापत होऊन हात व पाय गमावला आहे. रत्नापूर येथील नानाजी मडावी, रवी दडमल व अनिल टेकाम दुचाकीने विवाह संबंध जोडण्यासाठी चिटकी (मूरपार) येथे गेले होते. तेथून परत येताना दोन दुचाकीवर तिघे-तिघे निघाले. दोन्ही दुचाकी सरडपार-सिंदेवाही मार्गाने येत असताना पुढच्या दुचाकीला ट्रकची धडक बसली. ही धडक जोरदार असल्याने नानाजी मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रवी दडमल व अनिल टेकाम गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना सिंदेवाही येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. जखमींना घेऊन जात असताना रात्री १० वाजताच्या सुमारास रवी दडमल या युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही मृतांच्या पार्थिवावर रत्नापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंदेवाही पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)