शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्यांच्या दोन टोळ्या जेरबंद

By admin | Updated: October 21, 2015 00:52 IST

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अटक केली ...

मुद्देमाल हस्तगत : शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची कारवाईचंद्रपूर : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्यांना शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अटक केली असून या टोळ्यांच्या अटकेने घरफोडीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.एका टोळीत आठ तर एका टोळीत तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ आॅक्टोबरच्या मध्यरात्री स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या हसन ट्रेडर्समध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञात चोरट्यांनी लोखंडी सळाखीने शटर वाकवून चोरीचा प्रयत्न केला. यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ४५७, ३८०, ५११, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी आतिश राजू फुलझेले (३०), अमर देवराव धांडे (१९) दोघेही रा.बालाजी वॉर्ड चंद्रपूर व कुणाल यशवंत गर्गेलवार (२९) रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर या तिघांना अटक केली. या आरोपींनी चोरीची कबुली दिली असून मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. यातील कुणाल गर्गेलवार हा तडीपार असून तो शहरातून राहून गुन्हे करीत होता. त्याच्या अटकेनंतर त्याच्याविरुद्ध १ आॅक्टोबरला दुसरी घटना घडली. स्थानिक बागला चौक परिसरात लक्ष्मीचंद ग्यानचंद कोठारी यांचा जुना कारखाना आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास या कारखान्याची भींत फोडून वर्कशॉपमधून ५१ हजार २४५ रुपये किमतीचे लोखंडी व पितळेचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी भांदवि ४६१, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, पोलिसांनी कैलास रमेश वाघमारे, विजय राजू चुनारकर, महादेव चुनारकर, राजू कोलपेलवार, मनोज माधुरे, विनोद माधुरे, राजकुमार मेकलवार, ऋषी चुनारकर यांना मंगळवारी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल ताजने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रहुफ शेख, जमादार नरेश शेरकी,शिपाई प्रकाश बलकी, किशोर तुमराम, स्वामी चालेकर, किशोर वैरागडे यांनी केली. (प्रतिनिधी)