शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने भाजीपाला नेणारा मेटॅडोर पलटला

By admin | Updated: December 22, 2014 22:45 IST

वडसावरून कढोलीकडे आठवडी बाजाराकरिता भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मेटॅडोरचा समोरील टायर फुटून झालेल्या अपघातात वाहनातील ११ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी

कुरखेडा : वडसावरून कढोलीकडे आठवडी बाजाराकरिता भाजीपाला घेऊन जाणाऱ्या मेटॅडोरचा समोरील टायर फुटून झालेल्या अपघातात वाहनातील ११ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वडसा-कुरखेडा मार्गावरील कसारी फाट्याजवळ घडली. रिजवान पठाण (२७), सादीक शेख (३०), बंडू कांबळे (३०), कमलेश ठवरे (४०), कलाम शेख (२५) साबीर शेख (४०), अफाद शेख (३०), पंचफुला नैताम (४५) सर्व रा. वडसा, गोपीनाथ सहारे (६५), जगन बारसागडे (४०) रा. तळेगाव, रिनल लाडे (१८) रा. चोप (कोरेगाव) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार वडसा येथून एमएच २९ टी-३५२१ या क्रमांकाचा मेटॉडोर भाजीपाल्यासह विक्रेत्यांना घेऊन कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील आठवडी बाजाराकरिता जात असताना कसारी फाट्याजवळ अचानक मेटॅडोरचा समोरील टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात ११ जण जखमी झाले. जखमींना तत्काळ कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र रिजवान पठाण, कमलेश ठवरे, अफाद शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात मेटॅडोर वाहन पलटल्याने पूर्णत: क्षतिग्रस्त झाले. वाहनातील विक्रेत्यांचा भाजीपालाही अस्ताव्यस्त पडला. या घटनेसंदर्भात कुरखेडा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)