शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:30 IST

चंद्रपूर : येत्या काळातील निवडणुका बघता, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन युवक काँग्रेस प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी ...

चंद्रपूर : येत्या काळातील निवडणुका बघता, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन युवक काँग्रेस प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांनी केले.

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह येथे युवक काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रामू तिवारी, माजी अध्यक्ष नंदू नागरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिश कोत्तावार आदी उपस्थित होते. आढावा बैठकीत प्रितम पाटणकर यांची बल्लारपूर विधानसभा सचिवपदी तर महेश ऋषी मंडलवार यांची सिंदेवाही तालुका उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. बैठकीनंतर घुग्घुस शहर युवक काँग्रेसच्यावतीने शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते अनाथ आश्रम येथे अन्नधान्य साहित्य तर रहमत नगर येथे ज्येष्ठ व अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल व मुलांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव सचिन कत्याल, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, स्वप्निल कावळे ब्रम्हपुरी, संदीप कावरे चिमूर, जिल्हा महासचिव हाजी इमरान खान, अजय चिन्नुरवार, सुमेध चंदनखेडे, अक्षय मिस्त्री, फैजा़न शेख, घुग्घुस शहर अध्यक्ष तौफिक शेख, तालुका अध्यक्ष पवन निलमवार मूल, प्रशांत ढवले चिमूर, कैलाश मोगरे, आतिफ रजा़, प्रकाश देशभ्रतार, संतोष नेरवाटला, व्यंकटेश कलवल, अजित कोत्तावार, प्रवीण वडलुरी, राजकुमार येदुल्ला, नागराज आदी उपस्थित होते.