शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत निर्मितीचे खरे शिल्पकार रासेयो स्वयंसेवक: दीपक यावले

By admin | Updated: December 30, 2016 01:33 IST

ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना प्रभावीपणे करते. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी रुजविल्या जाते

चिमूर: ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना प्रभावीपणे करते. विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी रुजविल्या जाते. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळते. विद्यार्थ्यांना ज्ञान व अनुभवामुळे प्रगतीची दिशा मिळते. तसेच गावकऱ्यांचे सहजीवन अनुभवायला मिळते. यामुळे स्वच्छ गावाचा विकास झाल्यास देशाचा विकास नक्कीच होईल. स्वच्छ भारत निर्मितीचे खरे शिल्पकार राष्ट्रीय सेवा योजनेच स्वयंसेवक आहेत, असे प्रतिपादन गांधी सेवा शिक्षण समिती चिमूरचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले यांनी केले. चिमूर तालुक्यातील गोंदोडा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूरच्या वतीने सात दिवसाचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ‘स्वच्छ भारत अभियान’ या संकल्पनेवर शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन समारंभाप्रसंगी उद्घाटक म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूरचे प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर तर प्रमुख वक्ते म्हणून गांधी सेवा शिक्षण समिती चिमूरचे सचिव प्रा. किशोर वैद्य, मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. अंथोनी, स्थानिक व्यवस्थापन परिषदेचे अनिलसिंह राजपुत, गोंदोडा गुंफा समितीचे सचिव चंद्रभान शेंडे, सरपंच राजेंद्र धारणे आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर यांनी राष्ट्रसंतांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच प्रा. किशोर वैद्य यांनी चिमूर क्रांती व तुकडोजी महाराजांचे कार्य सांगितले. डॉ. दीपक यावले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, गावात स्वच्छतेची मोहीम सुरु केल्यास आपल्याला प्रत्यक्ष अनुभव मिळते. ग्रामीण भागातील जनतेचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आपल्याकडे संधी चालून आलेली आहे. यातून ग्रामीण विकासाला चालना मिळत असते. स्वच्छ भारत अभियान संकल्पनेवर शिबिर गावासाठी उपयोगाचे ठरणार आहे. संचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. पितांबर पिसे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. दिनकर राऊत यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार प्रा. प्रफुल्ल राजुरवाडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)