लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पडोली पोलिसांनी सोमवारी पहाटे विशेष मोहीम राबवित विदेशी दारूने भरलेल्या ट्रकवर कारवाई केली. यावेळी २८ लाख सहा हजार सहाशे रुपये किंमतीची २२८ पेट्या दारू व ट्रक असा एकूण ३८ लाख सहा हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पडोली पोलिसांची ही सततची तिसरी कारवाई आहे. त्यामुळे दारुविक्रेत्यांमध्ये दहशत पसरली आहे.एच आर १४ ई ०८५३ या ट्रकमधून विदेशी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावर ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ट्रकचा पाठलाग करण्यात आला. दरम्यान ट्रकचालकाने ट्रक विचोडा रोडवरील शेतशिवाराकडे वडविला व ट्रक सोडून पसार झाला. यावेळी पोलिसांनी १४० पेट्या आॅफीसर चॉईस, ५० पेट्या इम्पॅक्ट ग्रेन व्हिस्की, १४ पेट्या नंबर वन, १० पेट्या रॉयल स्टॅग, चार पेट्या नंबर वन बंपर, १० पेट्या आॅफीसर चाईस बंफर अशा एकूण २८ लाख सहा हजार ६०० रुपये किंमतीच्या २२८ पेट्या व ट्रक जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात ठाणेदार वैशाली ढाले, सुरेंद्र खनके, संदीप वासेकर, स्वाती बुटले, रामटेके, कुळमेथे, दरेकर आदींनी केली. विशेष म्हणजे ठाणेदार ढाले यांच्या नेतृत्वात पोलिसांची मागील तीन दिवस सतत कारवाई करीत ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सिनेस्टाइलने पकडला दारूसाठाचंद्रपूर : दारूची चोरटी वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरुन रामनगर पोलिसांनी सिनेस्टाइलने पाठलाग करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. चंद्रपुरात एका कारमधून दारूसाठा येत असल्याची माहिती ठाणेदार अशोक कोळी यांना मिळाली. त्यांनी लगेच गुन्हे शोध पथकाला सूचना दिली. डीबीचे सहायक पोलीस निरीक्षक दरेकर यांच्या नेतृत्वात पथकाने कारचा शोध घेत असताना संशयित कार सिंधी कॉलनी येथे दिसली. त्यानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. कारचालक फरार झाला. पोलिसांनी कारमधून ७० पेट्या देशीदारूसाठा जप्त केला.
विदेशी दारू भरलेला ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:45 IST
पडोली पोलिसांनी सोमवारी पहाटे विशेष मोहीम राबवित विदेशी दारूने भरलेल्या ट्रकवर कारवाई केली. यावेळी २८ लाख सहा हजार सहाशे रुपये किंमतीची २२८ पेट्या दारू व ट्रक असा एकूण ३८ लाख सहा हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पडोली पोलिसांची ही सततची तिसरी कारवाई आहे. त्यामुळे दारुविक्रेत्यांमध्ये दहशत पसरली आहे.
विदेशी दारू भरलेला ट्रक जप्त
ठळक मुद्दे३८ लाखांचा मुद्देमाल : पडोली पोलिसांची लागोपाठ तिसरी कारवाई