शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अंगावर येताना तोही पडला खड्ड्यात, क्रेनने काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

ट्रक अंगावर येईल, या भीतीने तो बाजूला पळाला आणि चार फूट खोल खड्डयात पडला.  त्याचा जीव वाचवण्यासाठी सिंदेवाही पोलिसांनी सर्वप्रथम या मार्गावरील वाहतूक बंद केली. भोजराज यांचा पाय मोडल्याने ते खड्डयातून बाहेर कसे निघणार, हा प्रश्न होता. त्यामुळे पोलिसांनी जेसीबी व क्रेन बोलाविली. त्याच्या साहाय्याने त्या खड्डयाच्या बाजूचा मुरूम हटवून समांतर खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर माटे यांना सुखरूप बाहेर काढले व उलटलेला ट्रकही सरळ केला.

ठळक मुद्देसिंदेवाही-नागपूर मार्गावरील विचित्र घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : सिंदेवाही - नागपूर हायवे रोडवरील पळसगाव जाट गावाजवळ गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान चंद्रपूरवरून सिमेंट भरलेला ट्रक नागपूरकडे जात असताना अचानक उलटला. यादरम्यान तेथून चालत चाललेला एक इसम ट्रक अंगावर येईल, या भीतीने बाजुला पळाला. मात्र या गडबडीत तो चार फूट खोल खड्डयात पडला. सर्वत्र मुरूम आणि पावसामुळे तो खड्ड्यात फसला. त्याच्या पायाचे हाड मोडल्याने त्याला बाहेर येता येत नव्हते. अखेर जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने समांतर दुसरा खड्डा खोदून त्याला बाहेर काढले, तसेच ट्रकलाही व्यवस्थित करण्यात आले. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबून होती.चंद्रपूरवरून सिमेंट घेऊन हा ट्रक नागपूरकडे जात होता. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पळसगावजवळ ट्रक उलटला. यादरम्यान भोजराज लक्ष्मण माटे (६५, रा. पळसगाव) हा तिथून लाकडे घेऊन जात होता. ट्रक अंगावर येईल, या भीतीने तो बाजूला पळाला आणि चार फूट खोल खड्डयात पडला.  त्याचा जीव वाचवण्यासाठी सिंदेवाही पोलिसांनी सर्वप्रथम या मार्गावरील वाहतूक बंद केली. भोजराज यांचा पाय मोडल्याने ते खड्डयातून बाहेर कसे निघणार, हा प्रश्न होता. त्यामुळे पोलिसांनी जेसीबी व क्रेन बोलाविली. त्याच्या साहाय्याने त्या खड्डयाच्या बाजूचा मुरूम हटवून समांतर खड्डा खोदण्यात आला. त्यानंतर माटे यांना सुखरूप बाहेर काढले व उलटलेला ट्रकही सरळ केला. भोजराज माटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

टॅग्स :Accidentअपघात