शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या २०० कोटींच्या भूखंडाचा गैरव्यवहार

By admin | Updated: May 29, 2015 01:45 IST

राजुरा तालुक्यातील राजुरा, बामनवाडा, चुनाळा यासह राजुरा तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी ज्या गैरआदिवासींनी हस्तगत केल्या, त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्च स्तरावर व्हावी.

बी. यू. बोर्डेवार राजुराराजुरा तालुक्यातील राजुरा, बामनवाडा, चुनाळा यासह राजुरा तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी ज्या गैरआदिवासींनी हस्तगत केल्या, त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्च स्तरावर व्हावी. राज्य शासनाने आदिवासींना उदरनिर्वाहासाठी जमिनी दिल्या होत्या. त्या जमिनीवर प्लाट टाकून विकण्यासाठी जमिनी दिल्या नाही. मात्र या भागातील भूमाफीयांनी या जमिनी दुसऱ्या आदिवासींच्या नावाने करून त्यांचे प्लाट पाडून विकून टाकले. हा भूखंड घोटाळा दोनशे कोटींच्या घरात आहे.राजुरा तालुक्यातील बारा आदिवासींचे ले-आऊट आदिवासींकडून गैरआदिवासीला विक्री करताना सक्षम अधिकारी यांची पुर्वपरवानगी घ्यावी लागते. तसे न करता विक्री केल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ चा भंग झाला आहे. याकरिता ते सर्व लेआऊट शासकीय पत्र क्रमांक ५०७ दिनांक १२ आॅगस्ट २०१३ ला रद्द करण्यात आले. यामध्ये राजुरा तालुक्यातील धोपटाळा सर्वे क्रमांक ५४ वारलु टेकाम, रामपूर येथील सर्वे क्रमांक ६६/२ गणपत टेकाम, राजुरा येथील सर्वे क्रमांक १४५ शामराव कुमरे, राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९/१४ माधव पंधरे, राजुरा येथील सर्वे क्रमांक १४४ सुधाकर उईके, राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९/१३ बाबुराव कन्नाके, राजुरा येथील सर्वे क्रमांक १४९/११ सुरेश सिडाम, कोरपना तालुक्यातील भिमा मडावी, व्यंकु मडावी या ले-आऊटवरील प्लाट सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.राजुरा शहरातील शासकीय जमिनी मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आल्या असून शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे राजुरा शहरातील कोट्यवधींची शासकीय जमीन अतिक्रमणधारकाच्या घशात जाताना दिसत आहे. यामध्ये अनेक आदिवासी बांधव भूमीहीन झाले असून महसूल अधिनियम १९७४ नुसार मुळ आदिवासींना जमिनी प्रत्यार्पित करून आदिवासींना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे. अनेक आदिवासींनी शपथपत्र दिले असून आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कोट्यवधींची जमीन कवडीमोल किंमतीमध्ये विकत घेऊन आदिवासी बांधवाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. राजुरा तालुक्यात शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण झाले असून मतांच्या राजकारणासाठी अतिक्रमण काढण्याची हिंमत राजकीय नेते करीत नाही.