शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थीही घेणार ई-लर्निंगचे धडे

By admin | Updated: September 10, 2016 00:45 IST

संपूर्ण जग विज्ञानाच्या युगात वावरत असताना जिवती तालुक्यातील दुर्गम भागात मात्र अद्यापही या सुविधा पोहचल्या नाहीत.

पालक आनंदी : पेसा अंतर्गत तालुक्यात ई-लर्निंगची पहिल्यांदाच सुरुवातजिवती : संपूर्ण जग विज्ञानाच्या युगात वावरत असताना जिवती तालुक्यातील दुर्गम भागात मात्र अद्यापही या सुविधा पोहचल्या नाहीत. ई- लर्निंग म्हणजे नेमके काय, हेच येथील आदिवासी कुटुंबांना माहित नाही. मात्र आता पहिल्यांदाच दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थीही ई-लर्निंगचे धडे गिरविणार आहेत.शासन अनेक शाळात ई-लर्निंग सुविधा प्राप्त करुन देत आहे. यामध्ये विशेषकरुन शहरी शाळाचा अधिक समावेश दिसतो. मात्र दुर्गम भागातील शाळांमध्ये काही कारणास्तव यासारख्या सुविधा अजूनही पोहचल्या नाहीत. असाच अतिदुर्गम भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्याची ओळख आहे. हा तालुका पेसा अंतर्गत येत असून आता येथील नऊ शाळांत ई - लर्निंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. तालुक्याची शिक्षणाची स्थिती पाहता, आजच्या घडीला शिक्षणच महत्वाचे असून पेसा अंतर्गत निधीचा वापर आपण ई- लर्निंग यावर खर्च करायचा, असे ठरवून संवर्ग विकास अधिकारी एस. जे. बागडे यांनी याकडे विशेष लक्ष दिले. शहरातील मुलांना मिळणारी सुविधा ही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याचे ठरवून गेल्या आठवड्यात त्यांनी नऊ शाळेत ही सुविधा सुरु केली आहे. यात पाटण, टेकामांडवा, भोक्सापूर, चिखली खुर्द, मरकागोंदी, राहपल्ली खुर्द, गडशेला, भारी आणि पुनागुडा या शाळांचा समावेश आहे.ई-लर्निंग म्हणजे काय हेच येथील विद्यार्थ्यांना माहित नव्हते. पण हेच विद्यार्थी आता ई-लर्निंगने धडे घेत असून विद्यार्थी स्वत: हा प्रोजेक्ट चालवत आहेत. एलईडी टीव्ही, संगणक, होम थिएटर बॉक्स आणि वर्ग १ ते १० साठीचा संपूर्ण अभ्यासक्रम असलेले साफ्टवेअर असे साहित्य आहेत. या ई-लर्निंग प्रोजेक्टसाठी एका शाळेला जवळपास दीड ते दोन लाखांचा खर्च येणार असून शहरातील शाळांतील मिळणारी सुविधा आज जिवती तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मुलांनाही मिळत आहे, अशी माहिती विस्तार अधिकारी ए. एस. महाजनवार यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)वर्षभरात सर्वच शाळा ई-लर्निंग करणारउच्च दर्जाचे शिक्षण दुर्गम भागात उपलब्ध करुन देणे, मानव विकास निर्देशांकात वाढ करणे, हे हेतू साध्य करायचे असून जिवती तालुक्यातील सर्वच शाळा येत्या वर्षभरात ई-लर्निंगयुक्त करु, असा मानस संवर्ग विकास अधिकारी एस.जे. बागडे यांनी व्यक्त केला.