आदिवासी सोसायटी हमी भावाने करणार धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:24+5:30

शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव उच्च धान प्रती क्विंटल १ हजार ८३५ व १ हजार ८१५ असा जाहीर केला आहे. तर प्रती क्विंटल ७०० रुपये अनुदान जाहीर केले आहे.

Tribal Society buys paddy at guaranteed prices | आदिवासी सोसायटी हमी भावाने करणार धान खरेदी

आदिवासी सोसायटी हमी भावाने करणार धान खरेदी

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : धान उत्पादकांना चिमूरला जाण्याची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी धानाचे उत्पादन बऱ्यापैकी झाले. परंतु बाजारामध्ये धानाचे भाव गडगडल्याने हमी भावाने धान खरेदी करावी, अशी मागणी केली जात होती. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ आदिवासी सेवा सहकारी सोसायटींना हमी भावाने धान खरेदी करण्याचे अधिकार दिल्याने या केंद्रावर धान विकल्यास हमी भाव व धानाकरिता शासनाने जाहीर केलेले अनुदानही धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शासनाने नाफेड मार्फत हमी भावाने धान खरेदी केंद्र चिमूर येथे सुरू केले. परंतु चिमूर येथे धान विक्रीस जाणे त्रासदायक होते. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी हमी भावाने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत होते. शासनाने हमी भाव उच्च धान प्रती क्विंटल १ हजार ८३५ व १ हजार ८१५ असा जाहीर केला आहे. तर प्रती क्विंटल ७०० रुपये अनुदान जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांना धान विक्रीकरिता जाताना धानाची नोंद असलेला सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक असने गरजेचे आहे. धान खरेदी एका शेतकऱ्यांकडून प्रती हेक्टर ३५ क्विंटल तर अनुदान ५० क्विंटलपर्यंत दिले जाणार आहे. धान विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. या नविन निर्णयामुळे काही प्रमाणात धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सोयाबीनची आवक वाढताच दर घसरले
चंद्रपूर : कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट सहन करीत शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक फटका सहन करावा लागतो. परतीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. काढणीला आलेले काही शेतकऱ्यांचे पीक पाण्यात गेले तर काही ठिकाणी पाणी लागल्याने सोयाबीनला डाग लागला. हाच डाग व्यापाऱ्यांची चांदी करणारा ठरला असून शेतकऱ्यांना मात्र याचा फटका सहन करावा लागत आहे. सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनला सर्वसाधारण दर तीन हजार ६०० रुपये प्रती क्विंटल होता मात्र, शेतकऱ्यांचा माल बाजारात विक्रीसाठी येताच सोयाबीनचा काळा डाग शेतकऱ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरला. ९० टक्के शेतकऱ्यांना कधीच उच्चांकी दर मिळाला नाही. मागील वर्षी साठवणूक करून ठेवणाऱ्या शेतकरी, व्यापाऱ्यांना दरवाढीचा अधिक फायदा झाला आहे. काळ्या डागाने प्रति क्विंटल किमान ८०० ते एक हजार रुपये शेतकऱ्यांना कमी मिळाले. त्यात पुन्हा ओलावा आल्याने शेतकरी पुरते हतबल झाले. रबी पेरणीच्या मशागतीसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी मिळेल तो दर घेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केले. मात्र महिना भरातच दर वाढत गेल्याने अनेक शेतकऱ्यांना पश्चातपही झाला.

Web Title: Tribal Society buys paddy at guaranteed prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.