शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

तृतीयपंथी मतदार कोणत्या रांगेत उभे राहून करणार मतदान? सहा मतदारसंघांत ४८ तृतीयपंथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:50 IST

Chandrapur : ब्रह्मपुरी व चिमुरात शून्य, तर चंद्रपूर विधानसभेत ३५ तृतीयपंथी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : संविधानात प्रत्येकालाच मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे मतदार यादीमध्ये पुरुष, स्त्री व इतर म्हणून तृतीयपंथीयांची नोंद केली जाते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात ४८ तृतीयपंथीयांची नोंद आहे. परंतु, प्रत्यक्षात मतदान केंद्रावर केवळ स्त्री व पुरुष अशीच स्वतंत्र मतदारांची रांग असते. त्यामुळे तृतीयपंथीयांनी कोणत्या रांगेत उभे राहायचे, असा प्रश्न तृतीयपंथीयांना प्रत्येकच निवडणुकीच्या वेळेस भेडसावत असतो.

२१ व्या शतकातही तृतीयपंथीयांची हेळसांड केली जाते. त्यामुळे ते समाजाकडून व शासनाकडून उपेक्षित आहेत. परिणामी अनेक तृतीयपंथी आपली ओळख लपवत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये सहाही मतदारसंघांचा विचार केल्यास ४८ तृतीयपंथी असल्याची नोंद आहे. अनेक जणांनी नोंदणी केली नाही, तर नोंदणी केलेले अनेक तृतीयपंथी मतदार मतदानाकडे पाठ फिरवत असल्याचे आजपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

सर्वाधिक तृतीयपंथी मतदार या मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, वरोरा, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर या सहा विधानभा क्षेत्रांचा समावेश होतो. यात एकूण ४८ तृतीयपंथीयांची नोंदणी आहे. त्यापैकी सर्वाधिक तृतीयपंथी हे चंद्रपूर विधानसभेत आहेत. चंद्रपूर विधानसभेत ३५ तृतीयपंथी मतदार आहेत.

नावनोंदणीत 'इतर' असा पर्याय; रांगा दोनच का

  • तृतीयपंथीयांच्या मागणीनुसार न्यायालयानेही त्यांची मतदार म्हणून स्वतंत्र नोंद घेतली. 
  • त्यामुळे मतदार नोंदणीतही इतर असा स्वतंत्र पर्याय ठेवला, तरीही अनेकांची नोंदणी झालेली नाही. 
  • लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुरुष आणि स्त्री मतदार अशा दोनच रांगा होत्या. परंतु, यंदा ज्येष्ठ, दिव्यांग आणि तृतीयपंथीयांना थेट मतदान केंद्रात प्रवेशाचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे.

तृतीयपंथी नाव नोंदणीत उदासीन का? २१ व्या शतकात तृतीयपंथी स्वतःची ओळख लपवत आहेत. त्यामुळे अनेक तृतीयपंथी नाव नोंदणीसाठी उदासीन दिसून येतात.

लोकसभेत फक्त ५ जणांनीच केले मतदानचंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातसुद्धा ४८ तृतीयपंथीयांची नोंद होती. त्यापैकी केवळ पाच तृतीयपंथीयांनी मतदान केले असल्याची माहिती आहे.

सहा मतदार संघांत ४८ तृतीयपंथी मतदार मतदारसंघ                     संख्या राजुरा                                ०२चंद्रपूर                                ३५बल्लारपूर                          ०७ब्रह्मपुरी                               ००चिमूर                                  ००वरोरा                                  ०४एकूण                                  ४८

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरTransgenderट्रान्सजेंडर