शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

मालगाड्या थांबतात प्रवाशी रेल्वे फलाटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर ५ फलाट आणि यार्ड पकडून १२ रेल्वेलाईन आहेत. दिल्लीकडील गाड्या फलाट क्रमांक एकवर आणि तेलंगणा, तामिळनाडूकडून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्या फलाट क्रमांक तीन व चारवर थांबविण्याचे वेळापत्रक आहे. या वेळापत्रकानुसारच प्रवासी गाडी पकडण्यासाठी फलाटावर जातात.

ठळक मुद्देबल्लारपूर रेल्वेस्थानक : गाडी आल्यास प्रवाशांची धावपळ

मंगल जीवने ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मध्य रेल्वेचे शेवटचे प्रवेशद्वार म्हणून बल्लारशाह रेल्वेस्थानक प्रसिद्ध आहे. या स्थानकावरून दरदिवशी ३८ सुपरफास्ट गाड्या धावतात. परंतु काही महिन्यापासून नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच फलाटावर येत असल्यामुळे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते. शनिवारी तेलंगणा व राजधानी सुपरफास्ट गाडी नियोजित फलाटावर न येत दुसºयाच फलाटावर आल्याने मोठी त्रेधातिरपीट उडाली होती.बल्लारशाह रेल्वे स्थानकावर ५ फलाट आणि यार्ड पकडून १२ रेल्वेलाईन आहेत. दिल्लीकडील गाड्या फलाट क्रमांक एकवर आणि तेलंगणा, तामिळनाडूकडून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्या फलाट क्रमांक तीन व चारवर थांबविण्याचे वेळापत्रक आहे. या वेळापत्रकानुसारच प्रवासी गाडी पकडण्यासाठी फलाटावर जातात. परंतु फलाटावर गेल्यावर अमुक गाडी या फलाटावर येत नसून दुसऱ्या फलाटावर येत आहे, अचानक घोषणा केली जाते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होते. या धावपळीत ज्येष्ठ नागरिक सोबत असेल तर पूल चढून खाली फलाटावर येतपर्यंत गाडी सुटते. या रेल्वेस्थानकावर केवळ पाच मिनीटांचा थांबा आहे. प्रवाशांसोबत दिव्यांग व्यक्ती असल्यास हाल होतात. या समस्येबाबत रेल्वे अधिकारी उत्तर द्यायला तयार नाहीत. ५ फलाटावर १४ खानपान वस्तू विकणाऱ्यांचे स्टॉल आहेत. लाखो रुपये खर्चून हे स्टॉल घेण्यात आले. परंतु नियोजित फलाटावर गाडी थांबत नसल्याने व्यवसायच होत नाही, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.रेल्वेच्या प्रतीक्षेत होते पुलावर गर्दीरेल्वेगाड्या कुठल्या फलाटावर येणार, याचा बऱ्याच प्रवाशांना अंदाज आला. त्यामुळे सरळ फलाटावर न जात प्रवाशी पुलावरच उभे राहतात. गाडी येणार असल्याची उद्घोषणा झाल्यानंतर फलाटावर उतरतात. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका आहे.प्रवाशी म्हणतात...रेल्वे प्रशासन मालवाहू गाड्यांकडे विशेष लक्ष आहे. परंतु, रेल्वेस्थानकावरील ५ पैकी एकातरी फलाटावर मालगाडी हमखासपणे उभी राहते. या मालगाड्या दोन ते तीन तास फलाटावरच उभ्या राहत असल्याने सुपरफास्ट गाडी दुसऱ्या फलाटावर थांबविल्या जाते. हा प्रकार बºयाच दिवसांपासून सुरू आहे. मालगाड्या यार्डमध्ये का लाावल्या जात नाही. तासनतास या गाड्या नेमके प्रवाशी फलाटावर उभे ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :railwayरेल्वे