शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

कस्तुरबा मार्ग व म. गांधी रोड ही शहरातील मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही रस्त्यावर अनेक छोटी-मोठी दुकाने बसली आहेत. पूर्वीच शहरातील ही दोन्ही रस्ते अरुंद त्यातही अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे ही रस्ते पुन्हा अरुंद झाली आहेत. म. गांधी मार्गावर लोकमान्य कन्या विद्यालय व लोकमान्य विद्यालय ही दोन विद्यालय आहे.

ठळक मुद्देअतिक्रमणामुळे रस्ते अरुंद : चंद्रपूर शहरातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील हिंदी सिटी शाळा, लोकमान्य कन्या व लोकमान्य विद्यालय या तिन्ही शाळा शहरातील मुख्य रस्त्यावर आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत प्रवेश करावा लागतो.कस्तुरबा मार्ग व म. गांधी रोड ही शहरातील मुख्य मार्ग आहेत. या दोन्ही रस्त्यावर अनेक छोटी-मोठी दुकाने बसली आहेत. पूर्वीच शहरातील ही दोन्ही रस्ते अरुंद त्यातही अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले. त्यामुळे ही रस्ते पुन्हा अरुंद झाली आहेत.म. गांधी मार्गावर लोकमान्य कन्या विद्यालय व लोकमान्य विद्यालय ही दोन विद्यालय आहे. तर कस्तुरबा मार्गावर हिंदी सिटी विद्यालय आहेत. या विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शाळा भरण्याच्या म्हणजेच सकाळी १० वाजता आणि शाळा सुटण्याच्या वेळेस सायंकाळी ५ वाजता यावेळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. तसेच यावेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी व पदचाऱ्यांची गर्दी असते.या गर्दीमध्ये विद्यार्थ्यांना रस्ता शोधत आपला जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते. परिणामी अपघाताची शक्यता आहे.शिक्षक दाखवतात मार्गविद्यार्थी सुरळीत शाळेत यावे व घरी जावे यासाठी शाळेतील शिक्षकांना हातात विसल घेऊन मुख्य रस्त्यावर उभे राहून विद्यार्थ्यांना मार्ग दाखवावा लागत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासोबत त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रयास करीत आहेत.वाहतूक शिपाई नेमण्याची मागणीम. गांधी मार्ग व कस्तुरबा गांधी मार्गावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.अनेकदा छोटे-मोठे अपघात घडले आहेत.या मार्गावर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर वाहतूक शिपाई नेमावा.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी