शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST

गेल्या काही महिन्यांपासून सदर टोलनाका ब्रह्मपुरीवासीयांना खुणावत होता. आता मात्र सदर टोलनाका रीतसर सुरू होत असल्याने वाहनचालकांना ये-जा करताना ...

गेल्या काही महिन्यांपासून सदर टोलनाका ब्रह्मपुरीवासीयांना खुणावत होता. आता मात्र सदर टोलनाका रीतसर सुरू होत असल्याने वाहनचालकांना ये-जा करताना टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

काही महिन्यांपूर्वी नागभीड-ब्रह्मपुरी राज्य महामार्गाचे रुंदीकरण करून सिमेंटीकरण करण्यात आले होते. सदर महामार्ग एकदम चकचकीत करण्यात येऊन ब्रह्मपुरीजवळ असलेल्या खरबी गावाजवळ टोलनाका उभारण्यात आला होता. सदर टोलनाका येत्या दोन तीन दिवसात सुरु होणार असल्याने वाहनचालकांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. विनाकारण फेरफटका मारायला जाणाऱ्या वाहनचालकांना यानंतर आर्थिक भुर्दंड बसणार आहे. कारण टोलनाका असल्याने ये-जा करण्यासाठी पावती फाडावीच लागणार आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांना चाप बसू शकतो. टोलनाका वसुलीसाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली असून विविध प्रकारच्या चारचाकी वाहनांना वेगवेगळ्या स्वरूपाचे दर आकारण्यात आले आहेत. त्यादृष्टीने टोलनाक्यावर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

एकंदरीत ब्रह्मपुरी लागून असलेला टोलनाका सुरू होत असल्याने यानंतर चारचाकी वाहनचालकांना टोलनाका भरुनच प्रवास करावा लागणार असल्याने वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.