शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून किलबिलाट

By admin | Updated: June 26, 2015 01:08 IST

शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या २६ जून रोजी सुरु होणार आहेत.

शिक्षण विभाग सज्ज : प्रवेशोत्सवाची जय्यत तयारीचंद्रपूर : शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या २६ जून रोजी सुरु होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध उपक्रमासह प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली असून शुक्रवारपासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी शाळेत उपस्थित राहणार आहेत. पहिल्या दिवशी प्रभात फेरी तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात येणार असून इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या बालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले जाईल. तसेच शालेय पोषण आहारात गोड पदार्थाचा समावेश करण्यात येणार आहे. शाळेत दाखलपात्र प्रत्येक मुलाचा व शाळाबाह्य मुलाचा शोध घेवून नियमित शा२ळेत प्रवेश देण्याचा उपक्रम राबविला जाणार असून विशेषत: प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर सर्व मुलींना शाळेत दाखल करुन घेतले जाणार आहे.विशेष गरजाधिष्ठित मुले, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती-जमाती, वंचित घटकातील सर्व मुले शाळेत दाखल करुन घेण्यासाठी पुढाकार घेतला जाणार असून या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व नोट बुकचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी १०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती आणि दर्जा शिक्षणाचा निर्धार प्रवेशोत्सव दिनी करण्यात येणार असून यासाठी महिला बचत गटांचे सहकार्य घेतले जाईल, असे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी कळविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पाठ्यपुस्तके पोहोचलीशुक्रवारपासून सर्व शाळांची घंटा वाजणार असून दाखलपात्र सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे. सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचवण्यात आली असून गुरूवारी अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तशा सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहचविण्यासाठी पालकमंत्री, खासदार तसेच लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्यातील एका शाळेत प्रवेशोत्सवासाठी हजर राहण्यासंबंधी शिक्षण विभागाकडून विनंती केली जाणार आहे.खुटाळा व घुग्घूस येथे कार्यक्रमदाखलपात्र विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी घुग्घूस व खुटाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले व जिल्हा परिषदेचे अन्य पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.