शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना शेतीच्या कामात वाघाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:20 IST

राजेश बारसागडे सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील वाढोणा, आलेवाही, ऊश्राळ मेंढा, खरकाडा, आकापूर आदी गावांत नरभक्षक वाघाचा ...

राजेश बारसागडे

सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील वाढोणा, आलेवाही, ऊश्राळ मेंढा, खरकाडा, आकापूर आदी गावांत नरभक्षक वाघाचा हैदोस सुरू असून, दोन गुरख्यांना ठार करून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, जनावरांना वाघाने फस्त केले आहे. सद्यस्थितीत वाढोणा परिसरातील अनेक गावांत शेतीचा हंगाम जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत तोंडाला मनुष्याच्या व जनावरांच्या रक्ताचा वास लागलेला नरभक्षक वाघ शेतकऱ्यांच्या रोवणी हंगामात अडसर ठरत आहे.

भीतिपोटी अनेक शेतकरी त्यांच्याच शेताकडे फिरकायलाही तयार नाहीत. दरम्यान, या नरभक्षक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील अनेक गावांतील शेतकरी तथा नागरिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आलेवाही बिट कक्ष क्र.७०३ मध्ये येत असलेल्या खरकाडा जंगल परिसरात मंगळवारी रमेश वाघाडे या गुराख्यास वाघाने ठार केले. त्या अगोदर जवळील आकापूर येथील गुराख्यास रात्रीच्या सुमारास वाघाने मारल्याची घटना घडली होती. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या व कित्येक जनावरांना या वाघाने ठार केले आहे. दोन्ही गुराख्यांना व विविध जनावरांना यमसदनी पाठविणारा नरभक्षक हा एकच पट्टेदार वाघ आहे, असे संबंधित गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. वाढोणा-ऊश्राळ मेंढा या गावांच्या मधोमध शेतशिवारांना लागून गोसेखुर्द कालवा गेलेला आहे. कालव्याच्या पाळीवर मोठमोठी झाडे तयार झाल्याने व झुडपी जंगल असल्याने, या परिसरात वाघाची वसाहत आहे, शिवाय रंगी तलावाच्या सभोवताल किरकोळ झुडपी जंगलाचा वेढा आहे आणि या वेढ्यासभोवताल वाढोणा, ऊश्राळ मेंढा, सावरगाव खरकाडा, जीवनापूर आदी गावांतील नागरिकांचे शेत आहेत. रमेश वाघाडेला ज्या परिसरात वाघाने मारले, त्याच परिसरात अर्जुन सोनवाणे रा.खरकाडा, सदाशिव मडावी रा.जीवनापूर, गुलाब कुळमेथे रा. जीवनापूर, मार्कंडी कोमावर रा.वाढोणा, राजू कुळमेथे, उत्तम मेश्राम, रवि सहारे, रामदास निकुरे, सुभाष गजबे यांच्यासह आलेवाही, आकापूर, वाढोणा, खरकाडा, ऊश्राळ मेंढा, जीवनापूर आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांची शेती आहेत, शिवाय रंगी तलाव शेजारीही ऊश्राळमेंढा व वाढोणा या गावांतील अनेक शेतकऱ्यांचे शेत आहे आणि सभोवताल जंगलाचा वेढा आहे. सद्यस्थितीत शेतीतील रोवणीचा हंगाम जोरात सुरू आहे आणि परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. हा वाघ केव्हाही जंगल परिसरातून शेतात प्रवेश करू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी स्वतःच्या शेतात जायला घाबरत आहेत.

बॉक्स

...आणि वाघ तिच्या मागे धावत आला

सावरगाव येथील एका शेतकऱ्याचे शेत वाढोणा परिसरातील खरकाडालगत जंगल परिसरात आहे. त्याची आई शेतात काम करीत असताना, अचानक वाघ तिच्या दिशेने येताना दिसला. ती इतर महिला रोवणी करत असलेल्या दुसऱ्यांच्या शेताकडे प्रचंड जोरात पळायला लागली. वाघही तिच्यामागे धावत आला. शेवटी ती इतर महिलांजवळ पोहोचली आणि महिलांची सामूहिक आरडाओरड सुरू झाली, तेव्हा कुठे वाघ माघारी परतला. ही घटना गुरुवारी घडली.

कोट

एकाच महिन्यात वाढोणा परिसरात दोन गावांतील दोन गुराख्यांना वाघाने ठार मारले. अनेक शेतकऱ्यांचे शेत खरकाडा जंगल परिसरात आहेत. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी घाबरलो आहोत. शेतात जाणे म्हणजे युद्धात गेल्यासारखे वाटू लागले आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त हवा आहे. मात्र, वनविभागाने अजूनही कुठलीही उपाययोजना केली नाही.

- अर्जुन गोपाला सोनवाने, शेतकरी, खरकाडा.

कोट :

नागभीड तालुक्यातील वाढोणा परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतालगतच्या परिसरात वाघाने मागील १५ दिवसांत बराच धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांत भीतीचे सावट पसरले आहे. परिणामी, शेतीची कामे खोळंबली आहेत. वाघाचा कायम बंदोबस्त करण्याबाबत खासदार अशोक नेते यांना कळविले आहे.

- होमदेव मेश्राम, माजी तालुकाध्यक्ष, भाजपा, नागभीड.