जिल्हाधिकाऱ्यांचा नावाने फिरणारा संदेश फेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST2021-05-05T04:47:09+5:302021-05-05T04:47:09+5:30

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा संदर्भ देऊन जिल्हाधिकारी यांच्याकडून ‘सूचना’ या मथळ्याखाली काही सूचनांचा संदेश व्हॉट्सॲपवर टाकण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून ...

Throw a message in the name of the Collector | जिल्हाधिकाऱ्यांचा नावाने फिरणारा संदेश फेक

जिल्हाधिकाऱ्यांचा नावाने फिरणारा संदेश फेक

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा संदर्भ देऊन जिल्हाधिकारी यांच्याकडून ‘सूचना’ या मथळ्याखाली काही सूचनांचा संदेश व्हॉट्सॲपवर टाकण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून हा संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफार्मवर फिरत आहे. या संदेशानुसार कुणीही बेकरी सामान, ब्रेड, पाव घेऊ नये, वृत्तपत्रे दुसऱ्या दिवशी वाचावीत १५ दिवसांची भाजी, धान्य घरी भरून ठेवावे, ऑनलाईन फूड डिलिव्हरी पूर्णत: बंद करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, असे कुठलेही निर्देश जारी झालेले नसून हा गैरसमज व भीती पसरविण्याचा प्रकार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या कोविड प्रोटोकॉल सूचनेशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाकडून असे कोणतेही वृत्त प्रकाशित केले जात नाही. या वृत्ताचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध नाही, असे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

बॉक्स

सायबर सेलकडून तपास

संबंधित पोस्ट कोणी प्रसारित केली याबाबत सायबर सेलकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये भीती व गैरसमज पसरविणाऱ्या अन्य पोस्टवरही नजर ठेवण्याची सूचना सायबर सेलला केली आहे.

Web Title: Throw a message in the name of the Collector