शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम रखडले

By admin | Updated: June 11, 2014 23:53 IST

राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन

विरुर (स्टे.) : राजुरा तालुक्यातील विरुर येथील बसस्थानकापासून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावावर तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदार आपल्या मर्जीनेच काम करीत असल्याने कामात गैरव्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे. पावसाळा लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खोदकाम केलेल्या खड्यात पाणी साचणार आहे. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.गावाचा विकास हा त्या गावातील रस्त्यावर अवलंबून असतो. स्वच्छ व सुंदर रस्त्यावरुनच गावाची चांगली-वाईट ओळख ठरते. मात्र विरुर गावाच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. बसस्थानकाजवळ सौंदर्यीकरण व रुंदीकरणाच्या नावावर रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या खड््यात पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. गावात हिवताप, मलेरिया, साथीच्या रुग्णांत वाढ होत आहे. तसेच रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम केल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.आमदार निधीतून मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरण करण्याकरिता निधी प्राप्त झाला. सदर काम राजुरा येथील एका कंत्राटदाराकडे देण्यात आले आहे. रस्त्याच्या एकिकडे कंत्राटदाराने मनमर्जीने रुंदीकरणाचे काम न्सिुरु केले आहे. सदर काम इस्टीमेट नुसार होत नसल्याचे नागरिकात बोलले जात आहे.रस्त्याच्या दुसरीकडील बाजूचे खोदकाम करताना जेसीपीने मुख्य पाण्याची पाईप लाईन फोडली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. खोदकाम करुन तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी रस्त्याचे बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. काम रखडण्याचे कारण अजूनही गावकऱ्यांना समजले नाही. सर्वाधिक वर्दळ असलेल्या बस स्थानक चौकाची अवस्था गंभीर असल्याने नागरिकांना पायी चालनेही कठीण झाले आहे. बसस्थानकाजवळळ सौंदर्यकरण व रुंदीकरणाच्या नावावर रस्त्याच्या कडेला खोदकाम केलेले बांधकाम त्वरित करावे व काम कशामुळे रखडले याची वरिष्ठ रस्त्यावरुन चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. (वार्ताहर)