शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नसबंदी शस्त्रक्रियेनंतरही दाम्पत्यास तिसरे अपत्य

By admin | Updated: December 31, 2016 02:01 IST

दोन अपत्य प्राप्तीनंतर शासनाच्या धोरणानुसार शासकीय शिबिरात स्त्रीने नसबंदी शस्त्रक्रिया केली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत : शासकीय लाभापासून दाम्पत्य राहणार वंचितवरोरा : दोन अपत्य प्राप्तीनंतर शासनाच्या धोरणानुसार शासकीय शिबिरात स्त्रीने नसबंदी शस्त्रक्रिया केली. मात्र त्यानंतरही दांम्पत्यास तिसरे अपत्य झाले. तिसरे अपत्य होण्यापूर्वी सदर दांम्पत्यांनी आपली कैफीयत शासन दरबारी मांडली. परंतु, उपयोग झाला नाही. आता तिसरे अपत्य झाल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून सदर कुटूंब दोष नसतानाही वंचित राहणार आहे. वरोरा तालुक्यातील एका गावातील हा प्रकार आहे. रितीरिवाजाप्रमाणे ओमदेव-वनमाला (बदललेले नाव) याचा विवाह झाला. मजुरी करून आपल्या कुटूंबियांचा गाडा हाकत असताना कुटूंबामध्ये एक मुलगा व एक मुलगी जन्माला आल्याने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया त्या स्त्रीने शासकीय शिबिरात करून घेतली. ‘हम दो, हमारे दो’ प्रमाणे कुटूंब मजुरी करून अत्यंत आनंदाने जीवन जगत होते. मात्र कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या स्त्रीला काही दिवसांपूर्वी गर्भधारणा झाली. त्यामुळे तिने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे दाखले घेवून शासकीय रुग्णालय गाठले व आपली आपबित्ती कथन केली. परंतु गरीब कुटूंबाच्या वेदनेकडे शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना बघण्याची उसंत मिळाली नाही. उंबरठे झिजवीत असताना ‘त्या’ मातेने तिसऱ्या अपत्यास जन्म दिला, याची शासकीय दप्तरामध्ये नोंद करण्यात आली. गरीब कुटूंबियाची कुठलीही चूक नसताना शस्त्रक्रियेच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने या कुटूंबियास आता त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेत असताना किती अपत्य आहे, याची विचारणा केली जाते. तिसरे अपत्य असल्यास शासकीय सुविधांचा लाभ मिळत नाही, ते दुर्दैव आता ‘त्या’ कुटूंबाच्या आड येत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)