शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडच्या शिक्षण विभागात विस्तार अधिकारीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : येथील शिक्षण विभागात एकही शिक्षण विस्तार अधिकारी नाही. १० केंद्र प्रमुखांपैकी केवळ दोन केंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागभीड : येथील शिक्षण विभागात एकही शिक्षण विस्तार अधिकारी नाही. १० केंद्र प्रमुखांपैकी केवळ दोन केंद्र प्रमुख कार्यरत आहेत. तर गट शिक्षण अधिकाऱ्याचा प्रभार शालेय पोषण आहार अधीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळाच बंद असल्या तरी मागील सत्रापर्यंत शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी शासनाकडून विविध उपक्रम प्रस्तुत करण्यात येत होते. मात्र त्याचवेळी या उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याच नसल्याने हे उपक्रम खरोखरच सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत खऱ्या अर्थाने पोचले असतील का? असा प्रश्न शिक्षण विभागातील या रिक्त जागा बघून निर्माण झाला आहे.

नागभीड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा विचार केला तर येथील गटशिक्षण अधिकाऱ्याचे पद चार वर्षापासून रिक्त आहे. तेव्हापासून हे पद भरण्याची तसदीच घेण्यात आली नाही. एखाद्या विस्तार अधिकाऱ्यांकडे पदभार देऊन नेहमीच या पदाचा गाडा हाकलणे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तर शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असूनही शालेय पोषण आहार अधीक्षकांकडे या पदाचा प्रभार देण्यात आला. आताही हा प्रभार कायम आहे. एक महिन्यापासून हे प्रभारी गट शिक्षण अधिकारी सुटीवर असल्याने ब्रम्हपुरी येथील एका शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडे हा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे.

येथील शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या ५ तर १० जागा केंद्र प्रमुखांच्या मंजूर जागा आहेत. मात्र सध्या या ठिकाणी एक शिक्षण विस्तार अधिकारी कागदावर दिसत असले तरी या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडे सिंदेवाही येथील गटशिक्षण अधिकाऱ्याचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला नागभीडच्या शिक्षण विभागाशी काहीही देणेघेणे उरले नसल्याची माहिती आहे. परिणामी नागभीड येथील शिक्षण विभाग विस्तार अधिकारीमुक्त झाला आहे. केंद्रप्रमुखांच्या १० जागा या ठिकाणी आहेत. मात्र सद्यस्थितीत केवळ २ केंद्रप्रमुख या पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत आहेत. या केंद्र प्रमुखांकडे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. तर केंद्र प्रमुखांची उणीव भरून काढण्यासाठी पदवीधर शिक्षकांना केंद्र प्रमुखांचा प्रभार सोपवून शिक्षण विभागाचा डोलारा चालविण्यात येत आहे.