शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांविषयी जागृक असणे गरजेचे

By admin | Updated: February 22, 2017 00:50 IST

वाढत्या आधुनिक जीवन शैलीचे अविभाज्य अंग असलेले इंटरनेट, त्याद्वारे होणारे गुन्हे आणि यातून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी इंटनेट वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे.

सुशीलकुमार नायक : सायबर गुन्हे जनजागृती कार्यशाळाचंद्रपूर : वाढत्या आधुनिक जीवन शैलीचे अविभाज्य अंग असलेले इंटरनेट, त्याद्वारे होणारे गुन्हे आणि यातून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी इंटनेट वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे. त्याकरिताजागृत असणे, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग चंद्रपूर सुशीलकुमार नायक यांनी केले. एनडी हॉटेल चंद्रपूर येथे ‘सायबर गुन्हे व जनजागृती’, यावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नायक बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कम्युनिटी पोलिसिंगफकरिता नेहमीच समाजातील संवेदनशील विषयांवर जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सायबर सेल पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर, सवर समान महिला बहुउद्देशीय संस्था, बंगाली कॅम्प आणि भारती नेचरक्युअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील एनडी हॉटेल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक दैनंदिन गोष्ट आॅनलाईन पद्धतीने होत आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेट व सोशल मीडिया हे जीवनाचे एक मुख्य घटक म्हणून समोर येत आहेत. या सर्व साधनांचा वापर करताना सायबर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बांबीवर समाजामध्ये जागृती यावी आणि कोणीही वाईट कृत्यास बळी पडू नये, या दृष्टिकोनातून सोशल मीडियाचा उपयोग करताना काय करावे व काय करु नये, याबाबत सायबर क्राईम सेलतर्फे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेमध्ये ‘सायबर क्राईम’, या विषयांवर सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे यांनी माहिती सादर केली. मुजावर अली, इमरान शेख, राहुल पोंदे यांनी पॉवर पॉईन्ट प्रेझेटेंशनद्वारे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, बँक फ्रांड केसेस व इंटरनेट अ‍ॅडिक्शन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच काही महत्त्वाच्या प्रकरणाबाबत माहिती दिली. श्रोत्यांनी मार्गदर्शन कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. भारती दुधानी, सुनिता सिंग, दुर्गा भगत, पुष्पा डे, कल्याणी मिश्रा आदींसह ज्येष्ठ नाग्रिक संघटनेचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण, महिला पुरुषांसह सर्व वयोगटातील श्रोता समुदाय उपस्थित होता. (प्रतिनिधी)