शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या पोलीस खात्यात अनेक खुर्च्या रिकाम्या

By admin | Updated: May 30, 2015 01:32 IST

महानगर होण्याच्या मार्गावर असलेल्या चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील पोलीस खात्यामध्ये अनेक खुर्च्या रिकाम्या आहेत.

रिक्त पदांचा भार : नव्या अधिकाऱ्यांची खात्याला प्रतीक्षाचंद्रपूर : महानगर होण्याच्या मार्गावर असलेल्या चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील पोलीस खात्यामध्ये अनेक खुर्च्या रिकाम्या आहेत. या रिकाम्या खुर्च्या अधिकारी रजेवर गेल्यामुळे नव्हे, तर पदे न भरण्यात आल्याने हे चित्र सध्या निर्माण झाले आहे.अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय जाधव यांचे स्थानांतरण झाल्याने ते लवकरच चंद्रपुरातून जाणार आहेत. मात्र त्यांच्या ठिकाणी नवीन अधिकारी कोण येणार, हे अद्याप ठरलेले नाही. सध्यातरी जाधव चंद्रपुरातच असले तरी, ते केव्हाही पदभार सोडण्याची शक्यता आहे.उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याही तीन खुर्च्या रिकाम्या आहेत. अलिकडेच चंद्रपूर आणि गडचांदूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. या सोबतच निवासी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचेही पद मागील काही दिवसांपासून रिक्तच आहे. ठाण्याचा कारभार सांभाळणाऱ्या पोलीस निरीक्षकांचीही चार पदे रिक्त आहेत. रामनगरच्या ठाणेदारांना लवकरच पदोन्नती मिळणार असल्याने या रिक्त पदांची संख्या पाचवर जाणार, हे नक्की आहे. या सोबतच, सहाय्यक पोलीस निरीक्षकांची तीन आणि पोलीस उपनिरीक्षकांची ३९ पदे रिक्त आहेत. अशी एकूण अधिकारी स्तरावरील सुमारे ५१ पदे रिक्त आहेत.जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्याने पोलिसांवरचा कामाचा ताण वाढला आहे. आहे त्याच मनुष्यबळामध्ये दारूबंदीचे शिवधनुष्य पोलीस पेलत आहेत. दारूबंदीच्या कारवायांसाठी विशेष पोलीस पथक निर्माण करण्याची घोषणा यापूर्वी झाली होती. मात्र अद्यापतरी हे पथक दृष्टिपथास आलेले नाही. चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक, दळणवळण, गुन्हेगारी या स्थितीवर लक्ष ठेवताना पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडत आहे. यात भरीस भर म्हणजे दोन मंत्र्यांचा ताफा शहरात केव्हाही येत असल्याने त्यांच्या तैनातीसाठीही पोलिसांना धावावे लागत आहे. पोलिसांच्या अपुऱ्या संख्याबळाकडे अद्यापतरी दोन्ही मंत्र्यांचे लक्ष जायचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)