शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर नगर परिषदेच्या इमारतीच्या बांधकामासाठी दहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:20 IST

चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील नगर परिषदेची इमारतदेखील आता नव्या आकर्षक व देखण्या रूपात बल्लारपूरकर जनतेच्या सेवेत रुजू होणार ...

चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील नगर परिषदेची इमारतदेखील आता नव्या आकर्षक व देखण्या रूपात बल्लारपूरकर जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नगर विकास विभागाच्या १६ जूनच्या शासन निर्णयानुसार बल्लारपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर शहराने विकासाचे विविध टप्पे अनुभवले आहे. १९९९मध्ये बल्लारपूर तालुक्याच्या निर्मितीनंतर या शहराच्या विकासाला त्यांनी मोठी गती दिली. अर्थमंत्रिपदाच्‍या काळात आमदार मुनगंटीवार यांनी, तर बल्‍लारपूर शहराचा चेहरामोहराच बदलला. विकासकामांची मोठी मालिकाच या शहरात तयार केली. शहरानजीक देशातील अत्‍याधुनिक अशी सैनिक शाळा साकारली असून, सर्व आवश्‍यक क्रीडा सुविधांनी परिपूर्ण असे तालुका क्रीडा संकुलदेखील पूर्णत्‍वास आले आहे. आता नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर झाल्याने एक नवे विकासकाम या विकासकामांच्या मालिकेत जोडले गेले आहे.