शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

धमकी दिल्याने युवकाची आत्महत्या

By admin | Updated: June 21, 2015 01:50 IST

दोन युवकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याने भयभीत झालेल्या एका युवकाने शनिवारी दुपारी स्वत:च्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली.

चंद्रपूर: दोन युवकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्याने भयभीत झालेल्या एका युवकाने शनिवारी दुपारी स्वत:च्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. स्थानिक नगिनाबाग परिसरात या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संदीप इंगोले (२२) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला तेथे आरोपींना अटक करण्याची मागणी करत मृताच्या नातलगांनी चांगलाच राडा केला. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.मृत संदीपचे कुटुंब स्थानिक नगिनाबाग परिसरात किरायाच्या घरात राहतात. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोन युवक संदीपच्या घरात शिरले आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोर संदीपला बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर या युवकांनी संदीपच्या घरातील टीव्ही उचलून नेला. जाताना पैसे परत करण्याचे फर्मानही त्यांनी सोडले. या साऱ्या प्रकारामुळे घाबरलेल्या संदीपने दुपारी १२ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मृताच्या कुटुंबाने दिली.मृताचा भाऊ समीर इंगोले याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नगिनाबाग परिसरात आॅनलाईन लॉटरीचा व्यवसाय करणारा दिनेश सहारे हा त्याच्या एका सहकाऱ्याला घरी घेऊन आला आणि त्या दोघांनी संदीपला मारहाण केली. त्यानंतर दुपारी त्याने घरातच फाशी घेऊन आत्महत्या केली.मृत संदीप सरळ स्वभावीमृत संदीप कधी-कधी आॅनलाईन लॉटरीच्या दुकानात जात असे. सरळ स्वभावी आणि अतिशय संवेदनशिल असलेल्या संदीपचे परिसरात अनेक मित्र आहेत. त्यांना संदीपच्या स्वभावाची माहिती आहे. आज घडलेला प्रकार संदीपच्या मनाला भिडला. त्यातूनच त्याने स्वत:ची जीवनयात्रा संपविली. आरोपींना अटक करा संदीपला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दिनेश सहारे व त्याच्या सहकाऱ्याला तातडीने अटक करण्याची मागणी संदीपच्या कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.