शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांवर शिक्षकांचे वेतन अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांतर्गत जिल्ह्यात पाच हजारांवर शिक्षक आहे. या शिक्षकांचे दरवेळी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन होते. मात्र यावेळी दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी वेतन झालेच नाही. प्रत्येक वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये साधारणत: इन्कमटॅक्स भरावा लागतो. सदर टॅक्स कमी अधिक प्रमाणात सर्वच शिक्षकांना भरावा लागला.

ठळक मुद्देआर्थिक ताण : कोरोनाच्या डे-नाईट ड्युटीमुळे शिक्षक वैतागले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे सर्वांवरच परिणाम झाला आहे. त्यातुन शिक्षक सुद्धा सुटले नाही. मागील दोन महिन्यांपासुन शिक्षकांचे वेतनच झाले नसल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक सध्या आर्थिक कोंडीमध्ये सापडले आहे. विशेष म्हणजे, फेब्रवारी महिन्याचे वेतन इन्कमटॅक्स देण्यामध्ये तर मार्च महिन्यामध्ये कोरोनाची २५ टक्के कपात आणि एप्रिल महिन्याचा जून महिना आला असतानाही वेतनच झाले नसल्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या शिक्षकांना पडला आहे.जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांतर्गत जिल्ह्यात पाच हजारांवर शिक्षक आहे. या शिक्षकांचे दरवेळी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन होते. मात्र यावेळी दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी वेतन झालेच नाही. प्रत्येक वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये साधारणत: इन्कमटॅक्स भरावा लागतो. सदर टॅक्स कमी अधिक प्रमाणात सर्वच शिक्षकांना भरावा लागला. त्यामुळे फेब्रुवारीच्या पगारातून अनेक शिक्षकांचे वेतन कपात झाले. त्यामुळे मार्च महिन्यात शिक्षकांना आर्थिक गणित जुळवावी लागली. पुढील महिन्याच्या वेतनातून आर्थिक समस्या सुटतील, अशी अपेक्षा असतानाच कोरोनाचे संकट घोंघावले आणि शासन आदेशानुसार प्रत्येक शिक्षकांच्या वेतनातून २५ टक्के रक्कम कपात करण्यात आली. त्यामुळे याही महिन्यामध्ये त्यांचे नियोजन कोलमडले. कसे बसे करीत यातून मार्ग काढत असतानाच एप्रिल महिन्याचे मेमध्ये भेटणारे वेतन अद्यापही झाले नाही. त्यातच आता जून महिन्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे घरखर्च, भाडे, शिक्षण, मुलांचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे. त्यातच आता जिल्हा परिषदेच्या बहुतांश शिक्षकांची शाळांमध्ये कोरोना ड्यूटी लावण्यात आली आहे. प्रत्येक शिप्टमध्ये आठ तास ड्यूटी करावी लागत असल्यामुळे हा अतिरिक्त ताणही त्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी केली जात आहे.देयक मंजुरीची प्रतीक्षाजिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या शिक्षकांचे वेतन प्रथम शिक्षण विभाग मंजूर करून वित्त विभागाकडे पाठवितात. त्यानंतर त्रुटी दुरुस्त करून वित्त विभाग कोषागार विभागात बिल सादर करतात. यावेळी मात्र शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे वेतनासंदर्भात कागदपत्र पाठविले. मात्र या विभागातून वेतनाचे बिलच मंजूर झाले नसल्यामुळे शिक्षकांचे वेतन अडल्याचे बोलल्या जात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक