शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर क्रॉफ्ट मेला लावण्याची परवानगी देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 01:08 IST

चंद्रपूर येथील पावन दीक्षाभूमीवर क्रॉफ्ट मेला लावण्यात येवू नये, अशी मागणी मागील तीन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी या संस्थेकडे ...

रिपब्लिकन सेनेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनचंद्रपूर : चंद्रपूर येथील पावन दीक्षाभूमीवर क्रॉफ्ट मेला लावण्यात येवू नये, अशी मागणी मागील तीन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी या संस्थेकडे जनतेच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र ही मागणी धुडकावून यावर्षीदेखील संस्थेच्यावतीने क्राफ्ट मेला लावण्याची परवानी दिली. त्यामुळे क्राफ्ट मेला लावण्यासाठी परवानगी देणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनातून केली आहे. याकृतीचा निषेध नोंदविण्याकरिता नागरिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला गेले असता, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर यांनी भेटायला टाळाटाळ करुन नकार दिला. या कृतीचा रिपब्लिकन सेना व उपस्थित पुष्पगुफा महिला मंडळ आणि रमाबाई बुद्ध विहारातील पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेटू घेतली. क्रॉफ्ट मेला लावण्यात येत असल्याने पावन दीक्षाभूमीचे पावित्र्य सदर संस्था नष्ट करीत असल्याचा आरोपी यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या असून रोष निर्माण झाला आहे. व्यवसाय करण्यासाठी परवानगी देऊन व्यावसायिक प्रतिष्ठान बनवू पाहणाऱ्या सदर संस्थेविरुद्ध कारवाई करावी अन्यथा शहरातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी अ‍ॅड. जगदीश खोब्रागडे, डॉ. फुलझेले, प्रशांत मेश्राम, सचिन उमरे, संदीप सोनोने, संदीप खोब्रागडे, सतीश निमसरकार, मनोज गावंडे, लक्की पाटील, चंद्रकिरण तामगडे, संजय तामगडे, दीक्षांत पाथार्डे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)