शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

लेखी आश्‍वासनानंतर सफाई कामगारांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : स्थानिक नगर पंचायतींतर्गत शहर स्वच्छतेचे कंत्राट स्वयंरोजगार ग्राहक संस्था, अहेरीला देण्यात आले होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी : स्थानिक नगर पंचायतींतर्गत शहर स्वच्छतेचे कंत्राट स्वयंरोजगार ग्राहक संस्था, अहेरीला देण्यात आले होते. मात्र, या संस्थेमार्फत कार्यरत सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या ईपीएफचा भरणा संस्थेकडून न करण्यात आल्याने सफाई कामगारांनी याविरोधात बंड पुकारून अगोदर साखळी उपोषण व नंतर बेमुदत उपोषण सुरुवात केले होते. अखेर नगर पंचायतीने सफाई कामगारांच्या मागण्या मान्य करत संबंधित संस्थेला ईपीएफचा भरणा करण्यासंदर्भात लेखी पत्र काढून कामगारांच्या इतरही मागण्या मान्य केल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

तत्पूर्वी २०१९-२०मध्ये स्थानिक नगर पंचायतींतर्गत शहर स्वच्छतेचे कंत्राट अहेरी येथील स्वयंरोजगार ग्राहक संस्थेला देण्यात आले होते. याचदरम्यान या संस्थेकडून सफाई कामगार म्हणून गोंडपिंपरी येथील कामगारांना कामावर घेण्यात आले. मात्र, त्यांना अल्प मजुरी देऊन व त्यांचा भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वेळोवेळी भरणा करण्यात आला नाही. यामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही बाब लक्षात येताच सफाई कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्याशी संपर्क साधून झालेल्या अन्यायाची माहिती देत नगर पंचायतीच्या परिसरात साखळी उपोषण सुरू केले. मात्र, आठ दिवस साखळी उपोषण करूनही नगर पंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सफाई कामगारांनी अखेर बेमुदत उपोषण सुरु केले. त्यामुळे नगर पंचायतीने या उपोषणाची गंभीर दखल घेत सफाई कामगारांच्या मागण्या मान्य करत संबंधित कंत्राटदार संस्थेला ईपीएफ भरण्यासंबंधी तसेच कामावरून काढून टाकलेल्या कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याबाबत, सफाई कामगारांवर देखरेख करण्याकरिता नियोजित कर्मचाऱ्याला कामावरून हटविणे तसेच बाजार परिसरात ठेवलेले वीजखांब परस्पर लंपास केल्याप्रकरणी संबंधित सुपरवायझरवर कारवाई करण्याची मागणी नगर पंचायतीने वीज मंडळाकडे केली आहे. एकंदरीत या संपूर्ण घटनाक्रमात कामगारांचे गेल्या पाच वर्षांत जे अर्थिक शोषण झाले त्याला आता पूर्णविराम मिळाला असून, उपोषणकर्त्या कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले.