शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णमहोत्सवी सोमनाथ श्रम संस्कार छावणीस आजपासून प्रारंभ

By admin | Updated: May 15, 2017 00:51 IST

थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी ५० वर्षांपूर्वी सोमनाथ येथे सुरू केलेल्या श्रम संस्कार छावणीस १५ ते २२ मे दरम्यान सुरूवात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमारोडा : थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी ५० वर्षांपूर्वी सोमनाथ येथे सुरू केलेल्या श्रम संस्कार छावणीस १५ ते २२ मे दरम्यान सुरूवात होत आहे. उद्यापासून सुरू होणारी छावणी सुवर्ण महोत्सवी असल्याने इतिहासाला उजाळा देणारी ठरणार आहे.१५ मे रोजी सुरू होणाऱ्या या छावणीस पूर्ण दिवस डॉ. विकास आमटे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरूवात होणार आहे. याशिवाय आनंदवन ते प्रयोगवन या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय आनंदवनची वाटचाल या विषयावर डॉ. कौस्तुक आमटे हे माहिती देणार आहे. डॉ. शितल आमटे, गौतम करजगी, डॉ. पल्लवी आमटे व डॉ. कौस्तुक आमटे यांचे संयोजन लाभलेल्या या छावणीस वेगळे महत्त्व असणार आहे.शिबिर प्रमुख रवींद्र नलगिंटवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरात महाराष्ट्रातील ३५ जिल्हे व बंगलोर, दिल्ली, सुरत, हैदराबाद, जयपूर आदी ठिकाणाहून ५०३ शिबिरार्थी सहभागी होत असून वयोगट १८ ते ४५ च्या ३२५ पुरुष व १७८ स्त्रियांचा समावेश राहील. विशेष बाब म्हणजे बाबांच्या काळातील अनेक समाजसेवी कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. नवोपक्रम म्हणून जपानी पद्धतीने वनीकरणाचे प्रशिक्षण येत्या ७ दिवसात शिबिरार्थींना दिले जाईल. याशिवाय शिबिराचे स्मरण राहावे म्हणून एक दगडी भिंत उभारली जाणार व त्यावर शिबिरार्थीचे मनोगत कोरले जाईल. सकाळी ४ ते रात्री १०.३० पर्यंत शिबिराचा कालावधी असेल. सर्च गडचिरोलीचे योगेश कालकुंडे, मुक्ता अवचट (पुणतांबेकर) अशा अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन व डॉ. विकास आमटे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी शिबिरार्थींना मिळणार अससल्याचे शिबिर प्रमुख नलगिंटवार यांनी सांगितले. सोमनाथचे कार्यकर्ते अरुण कदम, हरिभाऊ बडे आदी व्यवस्थेत मग्न राहतील.