शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवडणुकीच्या तोंडावर मनपा गटनेत्याचे निलंबन

By admin | Updated: October 28, 2014 22:53 IST

महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमधील गटबाजी शमविण्यासाठी पक्षाने अखेर निलंबनाचे हत्यार उपसले आहे. निवडणूक निरीक्षक निरीन राऊत यांनी बैठकीला

चंद्रपूर : महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमधील गटबाजी शमविण्यासाठी पक्षाने अखेर निलंबनाचे हत्यार उपसले आहे. निवडणूक निरीक्षक निरीन राऊत यांनी बैठकीला बोलावूनही अनुपस्थित राहणारे काँग्रेसचे मनपातील गटनेते संतोष लहामगे यांना मंगळवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यांच्या पदाची जबाबदारी आता प्रशांत दानव यांच्याकडे देण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक नितीन राऊत यांनी मंगळवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही निलंबनाची घोषणा केली.मनपा महापौर निवडणूक निरीक्षक म्हणून नितीन राऊत यांनी आज मंगळवारी महापौर संगीता अमृतकर, गटनेते संतोष लहामगे, नगरसेवक प्रशांत दानव, आणि महानगर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्याशी चंद्रपुरातील विश्रामगृहावर बैठक ठेवली होती. महापौर संगीता अमृतकर, स्थायी समिती सभापती रामू तिवारी आणि गटनेते संतोष लहामगे यांनी विश्रामगृहावर येऊन राऊत यांची भेट घेतली. मात्र बैठकीत सहभागी होण्याचे टाळले. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना नितीन राऊत म्हणाले, पक्षीय व्यासपीठावर येऊन आपले मत मांडण्याची संधी या तिघांनाही दिली होती. मात्र त्यांनी जाणिवपूर्वक पाठ फिरविली. संतोष लहामगे यांचे वर्तनही पक्षाच्या शिस्तीत बसणारे नव्हते. महापौरांशी आपण मोबाईलवरून संपर्क साधला मात्र बाहेरगावी असल्याचे सांगून त्यांनी येण्याचे टाळले. रामू तिवारी यांनाही मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र त्यांनी फोनच उचलला नाही. गटनेता या नात्याने संतोष लहागमे यांची जबाबदारी महत्वाची असतानाही त्यांनीही पाठ फिरविल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. स्थायी समितीचे सभापती आणि महापौरांवरही कारवाईची शिफारस आपण पक्षाध्यक्षांकडे करणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.उमेदवाराची घोषणा प्रांताध्यक्ष करणारकाँंग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा मुंबईतून प्रांताध्यक्ष करतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी एका उत्तारात दिली. ते म्हणाले, काँग्रेसच्या नगरसेवकांची बुधवारी बैठक होईल. त्यात पक्षाकडून उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल. हे नाव प्रदेशाध्यक्षांना कळविल्यावर त्यांच्याकडून महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल. आपल्याकडे सध्या तीन नावे आली आहेत. मात्र कुणाचेही नाव अद्याप नक्की झालेले नसल्याची माहिती त्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)